राजुरा पोलिसांची कारवाई, चोरीच्या 17 दुचाकीसह 8 लाख 20 हजार रु चा मुद्देमाल जप्त (Rajura police action, 17 stolen bikes seized with 3 accused and worth Rs 8 lakh 20 thousand)

Vidyanshnewslive
By -
0

राजुरा पोलिसांची कारवाई, चोरीच्या 17 दुचाकीसह 8 लाख 20 हजार रु चा मुद्देमाल जप्त (Rajura police action, 17 stolen bikes seized with 3 accused and worth Rs 8 lakh 20 thousand)

राजुरा :- पोलीस स्टेशन राजुरा येथे दिनांक ०७/०९/२०२३ रोजी फिर्यादी बागे पवन दिनेश बांडगुरे वय २७ वर्ष, जात - माळी, व्यव ग. रा. सोनीयानगर, राजुरा, जि. चंद्रपुर यांनी पो.स्टेला तकार दिली की, दिनांक ०६/०९/२०२३ रोजी सांयकाळी १७/०० वा मा यातील फिर्यादी त्याचे मालकीचे हिरो कंपनीची स्प्लेंडर प्रो गाडी क एम.एच ३४ ए.टी ३४९३ ही घेतुन पोलीस भरतीची प्रॅक्टीसकरीता ज्योतीबा शाळा राजुरा येथे गेला व शाळेसमोरील गेटसमोर गाडीला हॅन्डल लॉक करून पोलीस भरती प्रॅक्टीस करीता शाळेचे ग्राउंड मध्ये गेला व प्रॅक्टीस करून अंदाजे १९/०० वा. गाडी ठेवलेल्या ठिकाणी येवुन पाहीले असता त्याला त्याची मोदार यायकल दिसली नाही. तेव्हा त्यांनी गाडीचे आजुबाजुचे परीसरात शोधा-शोध केली परंतु मिळून न आल्याने त्याची जुनी वापरती काळया रंगाची हिरो कंपनीची, स्प्लेंडर प्रो मोटार सायकल क्र. एम एच ३४ ए. टी ३४९३ ज्याचा चेसीस नं MBLHA10A3EHG42561 व इंजिन नं HA10EIEHG68100 असा असलेले कि. अं २०,०००/- रू चा माल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याची तकार दिलेवरून पोस्टे राजुरा येथे अप के ४८६ / २०२३) कलम ३७९ भादवी अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे. सदर गुन्हयातील चोरीस गेलेली मोटार सायकलचा शोध घेणेकामी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा गुन्हे शोध पथकातील मा. प्रभारी सपोनी धर्मेंद्र टी. जोशी सा. सोबत सफौ खुशाल टेकाम, पोहवा किशोर तुमराम पोहवा सुनिल गौरकार, पोशि महश बोलगोडवार, पोशि रामराव बिंगेवाड, पोशि तिरूपती जाधव असे मिळुन अतिशय परीश्रम घेवुन तीन आरोपींना ताब्यात घेवुन त्यांना अटक करून गुन्हयातील इतर चंद्रपुर जिल्हयातील चोरीस गेलेल्या १६ मोटार सायकल असे एकुण १७ मोटार सायकल एकुण कि. ८,२०,०००/- रु वा मुद्देमाल जप्त केले आहे. पोलीस स्टेशन अप क ४८६ / २०२३ कलम ३७९, ३४ भादवी, १) होमेश्वर उर्फ ​​हर्षल नामदेव देवतळे वय २८ वर्ष, रा. लोनी, ता कोरपना, जि. चंद्रपूर, २) मिलींद जयभारत डंभारे वय ३० वर्ष, महाराष्ट्र, रा. लोनी, ता. कोरपना, जि. चंद्रपूर, ३) अलबास जाऐद शेख वय २४ वर्ष, रा. देवाडा, ता. राजुरा, जि. चंद्रपूर सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री रविद्रसिंह परदेशी सा, मा. अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दिपक साखरे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली राजुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोनी योगेश्वर पारधी, सा. सपोनी धमेद्र टी. जोशी सा. सोबत सफौ खुशाल टेकाम, पोहवा किशोर तुमराम पोहवा सुनिल गौरकार, पोशि महश बोलगोडवार, पोशि रामराव बिंगेवाड, पोशि तिरुपती जाधव यांनी केली आहे. अशी माहिती प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन राजुरा यांनी दिली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)