बल्लारपुरात सुधिर लोखंडे यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या (Sudhir Lokhande committed suicide by hanging himself in Ballarpur)
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक विद्यानगर वॉर्डातील रहिवासी असलेले व मागील 22 वर्षांपासून पत्रकार म्हणून प्रसिध्द असलेले व दैनिक युगधर्म आयु. सुधिर भाऊराव लोखंडे वय - 50 वर्ष यांनी आज सायंकाळी 4:00 वाजताच्या दरम्यान आपले राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. सुधिर लोखंडे हे बल्लारपूर पेपर उद्योगात कार्यरत होते मात्र काही काळापासून ते निलंबित असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे. यासोबतच ते पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत होते. सदर घटनेच्या वेळी घरी कुणीच नसल्याची संधी साधत हे कृत्य केल्याची माहिती प्राप्त होत आहे. आत्महत्येचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता त्यांनी घटना स्थळ गाठत मृतदेह उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे पाठविण्यात आला असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या