महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात ' जागतिक मूलनिवासी दिन ' व क्रांति दिन साजरा (Mahatma Jyotiba Phule College celebrates 'World Indigenous Day' and Revolution Day)

Vidyanshnewslive
By -
0

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात ' जागतिक मूलनिवासी दिन ' व क्रांति दिन साजरा (Mahatma Jyotiba Phule College celebrates 'World Indigenous Day' and Revolution Day)


बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात ' जागतिक मूलनिवासी दिन ' व क्रांति दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विचार पिठावर प्रमुख उपस्थिती म्हणून नितेश उरवते, विकास अधिकारी, भारतीय जीवन विमा निगम,  प्रा. डॉ. बादलशाह चव्हाण, प्र-प्राचार्य महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर, प्रा.डॉ.किशोर चौरे, इतिहास विभाग प्रमुख, प्रकाश मेश्राम, वरिष्ठ लिपिक ई ची उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवर अतिथींचे महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी शाल श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार केला तदनंतर मान्यवरांच्या व्याख्यानाला प्रारंभ झाला यावेळी मार्गदर्शन करतांना नितेश उरवते म्हणालेत की, भारताचे मूलनिवासी म्हणून आदिवासी जमातीचा उल्लेख केला जाती आदिवासी समाजाने भारतीय समाजाला  महत्वपूर्ण देणगी दिली असून  या जमातीला शूरवीर असे एकलव्य सारखा विद्यार्थी लाभला ज्याने गुरुदक्षिणा देतांना कसलाही विचार केला नाही शिवाय आयुर्वेद व नेचरोपॅथी सारख्या औषधीची देण ही मूलनिवासी ची आहे. तसेच या जागतिक मूलनिवासी दिनाच्या निमित्ताने अनेक महत्वपूर्ण माहिती त्यांनी विद्यार्थ्यांशी शेयर केली. विशेष म्हणजे युनो साऱख्या जागतिक संघटनेने 9 ऑगस्ट 1994 पासून जागतिक मूलनिवासी दिन घोषित केला. 

       यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण म्हणालेत की " देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारकाची महत्वपूर्ण भूमिका असून 9 ऑगस्ट 1942 ला झालेली क्रांति ही भारताला दिशा देणारी ठरली विशेषतः विदर्भातील आष्टी व चिमुरचा स्वातंत्र्य लढा इतिहासात अजरामर झाला यासोबत जागतिक मूलनिवासी दिनासोबत क्रांति दिनाच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा दिल्या. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रकाश मेश्राम, संचालन प्रा.डॉ. किशोर चौरे व आभार प्रदर्शन प्रा. दिपक भगत यांनी केले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रा.डॉ. विनय कवाडे, प्रा. डॉ. रोशन फुलकर, प्रा. डॉ. बालमुकुंद कायरकर, प्रा. डॉ. रजत मंडल, प्रा.डॉ. पंकज कावरे, प्रा. डॉ. पल्लवी जुनघरे, प्रा. सतिश कर्नासे, प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. ले. योगेश टेकाडे, प्रा. शुभांगी भेंडे(शर्मा), प्रा. रोशन साखरकर, प्रा. दिवाकर मोहितकर, प्रा. सविता पवार, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. श्रध्दा कवाडे, यांच्यासह शिक्षकत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)