धक्कादायक ! चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेचा उपचाराअभावी मृत्यू (Shocking ! A nurse on duty at the Government Medical College in Chandrapur died due to lack of treatment)

Vidyanshnewslive
By -
0

धक्कादायक ! चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेचा उपचाराअभावी मृत्यू (Shocking ! A nurse on duty at the Government Medical College in Chandrapur died due to lack of treatment)


चंद्रपूर :- चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यासह तेलंगणा राज्यातील ग्रामीण भागातील अनेक गरीब आणि गरजू रुग्ण कमी खर्चात उपचार व्हावे, यासाठी चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती होत असतात. मात्र, येथील रुग्णालयात रुग्णांना योग्य उपचार सुविधा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. सामान्य माणसांना उपचार न मिळणे ही नित्याचीच बाब झाली असताना याच रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या एका परिचारिकेला उपचाराअभावी जीव गमवावा लागला, हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा पुरावा आहे. इतरांची काळजी घेण्यासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या एका परिचारिकेला जीव गमवावा लागतो, यासारखी लाजिरवाणी घटना नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सोयी सुविधांकडे सत्ताधाऱ्याचे लक्ष आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आढावा घेत नाहीत.  वैद्यकीय अधिकारी कोणालाच जुमानत नाही, अशी स्थिती निर्माण झाल्याने सामान्य माणसांच्या आरोग्याचे हाल होत आहे. रुग्णांची दुर्दशा ही चिंतेची बाब असून, रात्रपाळीत वैद्यकीय अधिकारी का उपलब्ध नव्हते, तज्ञ्ज डॉक्टर कुठे गेले होते, रात्रभर मृत्यूशी झुंज देणाऱ्या परिचारिकेची का तपासणी झाली नाही, या घटनेची आरोग्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केली आहे. चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने परिचारिका सीमा मेश्राम यांना आपला जीव गमवावा लागला. शासकीय रुग्णालयात सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळत नाही, हे उघड आहे. मात्र, त्याच रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सला उपचाराअभावी जीव गमवावा लागतो, ही घटना दुर्दैवी असून, निष्काळजीपणाचे लक्षण आहे. या संदर्भात अधिक माहिती नुसार सदर परिचारिका ही प्रसूती कक्षात कार्यरत असतांना 16 ऑगस्टला रात्रीच्या सुमारास भोवळ येऊन पडली असल्याचं वृत्त आहे सदर परिचारिकेला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र योग्य त्या पध्दतीने उपचार न मिळाल्यामुळे उपचारा अभावी परिचारिकेचा मृत्यू झाला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)