अमृत ​​भारत स्थानक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारशाह व चांदाफोर्ट स्थानकांची निवड, ६ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या हस्ते थेट उद्घाटन (Selection of Chandrapur, Ballarshah and Chandafort stations in the district under the Amrit Bharat Station scheme, directly inaugurated by the Prime Minister on August 6)

Vidyanshnewslive
By -
0

अमृत ​​भारत स्थानक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारशाह व चांदाफोर्ट स्थानकांची निवड, ६ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या हस्ते थेट उद्घाटन (Selection of Chandrapur, Ballarshah and Chandafort stations in the district under the Amrit Bharat Station scheme, directly inaugurated by the Prime Minister on August 6)

बल्लारपूर :-: रेल्वे स्थानकांच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वे मंत्रालयाची महत्त्वाकांक्षी अमृत भारत स्टेशन योजना ABBS, देशभरातील निवडलेल्या ५०८ स्थानकांपैकी मध्य रेल्वेच्या मुंबई झोनमध्ये ७६ स्थानके आहेत. त्यामध्ये नागपूर रेल्वे विभागातील १५ स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या दिवशी 508 स्थानकांवर सकाळी 9.30 ते दुपारी 12 पर्यंत सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता थेट उद्घाटन करतील. या सर्व ठिकाणी स्थानिक खासदार, मंत्री आणि आमदारांना निमंत्रित करण्यात आले आहे. मध्य रेल्वे विभागातील नागपूर रेल्वे विभागातील चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर आणि बल्लारशाह स्थानके आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागातील चांदा फोर्ट स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे.

        बल्लारशाह रेल्वे स्थानकात 34 कोटी, चंद्रपूर रेल्वे स्थानकात 28 कोटी तर दक्षिण पूर्व अंतर्गत येत असलेल्या चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर 25 कोटी खर्चाची विविध विकासकामे राबविण्यात येणार आहेत. या तिन्ही स्थानकांमध्ये एस्केलेटर, स्लॅब, फूट ओव्हर ब्रिज, प्लॅटफॉर्म शेल्टर, मेन गेट, पार्किंग एरिया, लिफ्ट टॉयलेट, वेटिंग रूम, गार्डनचे सुशोभीकरण आदी विकासकामे करण्यात येणार आहेत. यातील काही कामे प्रगतीपथावर आहेत तर काही निविदा प्रक्रियेत आहेत. बल्लारशाह आणि चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, एनआरयूसीसी सदस्य अजय दुबे, तर चंद्रपुरात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आणि आमदार किशोर जोरगेवार उपस्थित राहणार आहेत. सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती अजय दुबे, राष्ट्रीय रेल्वे ग्राहक, सल्लागार परिषद NRUCC रेल्वे मंत्रालय नवी दिल्ली बल्लारशाह यांनी दिली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)