सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध पुरस्कारासाठी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज आमंत्रित (Applications are invited till 15th August 2023 for various awards on behalf of Social Justice Department)

Vidyanshnewslive
By -
0

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध पुरस्कारासाठी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज आमंत्रित (Applications are invited till 15th August 2023 for various awards on behalf of Social Justice Department)

चंद्रपूर :- सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित करण्यात आले असून नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था, उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक, व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने समाजकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक- व्यक्तींना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. 2019-20, 2020-21, 2021-22, व 2022-23 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या विविध पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. समाजकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इच्छुकांनी सदर पुरस्कारासाठी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज नमूद कागदपत्रासह सादर करावे. विविध पुरस्काराची जाहिरात व अर्जाचा नमुना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https:jsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन समाजकल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे. यापूर्वी अर्जदार संस्था ज्यांनी, 2019-20, 2020-21 व 2021-22 या वित्तीय वर्षाकरीता अर्ज केला आहे, त्यांना नव्याने या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी ज्या वर्षाकरीता अर्ज केला आहे त्या वर्षाकरीताचे चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करावा. तसेच यापूर्वी अर्ज केलेल्या व्यक्तींना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ज्या वर्षासाठी, ज्या पुरस्काराकरीता अर्ज करण्यात येत आहे, त्या वर्षासाठी त्या पुरस्काराकरीता विहित केलेल्या अटीची पूर्तता करणे आवश्यक राहील.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)