स्वातंत्र्यदिनी उपक्रमांची उधळण, नवेगाव पांडव वासियांनी दिला "आदर्श" संदेश. (A flurry of activities on Independence Day, Navegaon Pandav residents gave an "ideal" message.)

Vidyanshnewslive
By -
0

स्वातंत्र्यदिनी उपक्रमांची उधळण, नवेगाव पांडव वासियांनी दिला "आदर्श" संदेश. (A flurry of activities on Independence Day, Navegaon Pandav residents gave an "ideal" message.)

नागभीड :- ' गाव करी ते राव न करी' याची अनुभूती नवेगाव पांडव येथील स्वातंत्रोत्सव बघून परिसरातील  जनतेचा आली. काय तो उत्साह, काय ती उपक़मांची शिस्तबद्ध आखणी अन काय तो आबालवृद्धांचा एकोपा. स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन देशात मोठया उत्साहात साजरा झाला. नवेगाव पांडव वासियांनी या उत्साहाला सर्वधर्मीय सप्तरंगाची किनार जोडून वेगळेपण जपल्याने हा उत्सव नेत्रदिपक ठरला. ग्रामपंचायतीचा पुढाकार, समाजातील सर्व घटकांचा सहभाग, शिस्त, प़ोटोकाल, गावातील माजी सैनिक व परिवारजनांचा सन्मान, आदर्श ग्रामस्थांचा सत्कार, शालेय गुणवंतांचे कौतुक, विदयार्थ्यांचे संदेशात्मक सांस्कृतीक प्रयोग.व नजरेत भरणारे गावकऱ्यांची केलेले ग्रा.प.पदाधिकारी, सदस्य,  कर्मचारी यांचा केलेला भावनिक सन्मान. येथील ने.हि.विद्यालय, धर्मराव विद्या. व जि.प.प़ाथमिक शाळेच्या विदयार्थ्यांचे संपूर्ण गावात प्रभातफेरी काढून बँड पथक, एन.सी.सी.कैडेट च्या पथकासोबत सकाळी ८ वाजता ग्रा.प. परिसरात आगमन झाले. संपूर्णपरिसर गावकरी,विद्यार्थी यांनी व्यापला. मुख्य अतिथी प्रा.महेश पानसे, शशिकांत रहाटे यांचे हस्ते महात्मा गांधीं व डा.बाबासाहेब आंबेडकर यांचे परिसरातील स्मारक देशभक्तीच्या गर्जनेत पूजन. तदनंतर परिसरातील  दोन्ही ध्वजारोहन परंपरेनुसार गुणवंत विदयार्थी यांचे हस्ते संपन्न. संपुर्ण गाव भारत माता की जय या घोषनेने दुमदुमला. विदयार्थी  व गावकऱ्यांच्या सोबतीने कार्यक्रमाची शिस्तबद्ध सुरवात. झाली. अध्यक्षस्थानी प्रथम नागरीक एड.शर्मिला रामटेके होत्या. सुरवातीला तिन्ही शाळेतून गुणवंत ठरलेल्या १५ विदयार्थ्यांंचा देखणे स्मृतीचिन्ह देऊन कौतुक करण्यात आले. शाळेय विदयार्थ्यांनी केले सामाजीक, देशभक्तीपर रंगीबेरंगी सादरीकरण .प्रा. महेश पानसे, शशिकांत रहाटे वनअधिकारी नरेश मडावी या गाव पुत्रांचा सामाजीक कार्यासाठी भावनिक,जोशात सत्कार व या नंतर गावातील माजी सैनिक अनिल मेश्राम, श्रीमती शारदाताई यांचा भव्य सत्कार करण्यात आला. गत साडेचार वर्षात अनेक विकास कामांना चालना देत ग्रा.प.ला राज्योंस्तरावर लौकिक मिळवून देणाऱ्या सरपंच  उपसरपंच, सदस्यगण व कर्मचारी यांचा गावकऱ्यांनी मोठा सन्मान व गौरवांकित करुन नवा आदर्श घालून दिला.सतत ३ तास चाललेल्या या सप्तरंगी स्वातंत्रोत्सवात सरपंच शर्मिला रामटेके, उपसरपंच विजयजी मुख्याध्यापक नरेन्द्र चुऱ्हे, मुख्याध्यापीका पपिता चावरे, विदयाताई मेश्राम, ज्येष्ठ नागरीक बन्सीलाल चुऱ्हे,दिवाकरराव नवघडे, रघुनाथराव पानसे, ग्रा.प.सदस्या सर्वश्री रितेश पांडव, सुनील शेंडे,  सौ.निरंजनाय सोनटक्के, कल्पना नवघडे, मालतीताई तिजारे, मिराताई मशाखेत्री, ग्रा.प.कर्मचारी विजय नवघडे, अतुल पांडव, धनराज आंदोलने, सोमेश्वर पांडव यांचा पुढाकार व उपस्थीती नजरेत भरली. प्रास्ताविक रितेश पांडव यांनी केले. या सप्तरंगी स्वातंत्रोत्सवाचे बहारदार संचालन शिक्षक सतिष  डांगे यांनी केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)