बल्लारपुरात लोककवी वामनदादा कर्डक यांची जयंती साजरी (Birth anniversary of folk poet Vamandada Kardak celebrated in Ballarpur)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपुरात लोककवी वामनदादा कर्डक यांची जयंती साजरी (Birth anniversary of folk poet Vamandada Kardak celebrated in Ballarpur)


बल्लारपूर :- आंबेडकरी आंदोलनातील महाकवी वामनदादा कर्डक यांची जयं,ती बल्लारपूरत नुकतीच साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे उत्घाटन बल्लारपूर नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते पवन भगत, भारत थूलकर यांच्या हस्ते वामनदादा यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून  करण्यात आले. तथा केक कापून दादांची जयंती साजरी करण्यात आली. दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्थानिक विश्राम गृहात पार पडलेल्या कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी वामनदादा यांच्या कवितांना उजाळा दिला. त्यात प्रामुख्याने नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत थुलकर, पवन भगत, अजय चव्हाण, दिक्षा धोंगडे, प्रियंका चव्हाण, ईश्वर देशभ्रतार, अशोक भावे, प्रभूदास गायकवाड, प्रसाद चव्हाण, धर्मेंद्र गायकवाड, भोजराज पाटील, अनिल भाले, महेंद्र गजभिये, अरुण लोखंडे, अनिल उमरे, मधुकर उमरे, नीलकंठ पाटील, रमण पुणेकर, मिलिंद ताजने, रुपेश मुन, प्रशांत सातकर, महेंद्र बेताल, रवी मेश्राम यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे उत्कृष्ठ आयोजन प्रियांका चव्हाण, दिक्षा धोंगळे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  पत्रकार नरेंद्र सोनारकर यांनी केले.  समारोपीय कार्यक्रमात प्रियंका चव्हाण, अशोक भावे, अजय चव्हाण दिक्षा धोंगळे, नरेंद्र सोनारकर यांच्या वतीने वामनदादा यांचे क्रांतिगीते, स्फूर्ती गिते सादर करून वामनदादांना आदरांजली अर्पण करण्यात आली.  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रियंका चव्हाण यांनी केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)