अबब ! आजाराचे निदान करण्यासाठी इंजेक्शन दिले, मात्र सुई रुग्णाच्या शरीरात घुसली, शस्त्रक्रिया करून काढावी लागली सुई (Abba! An injection was given to diagnose the disease, but the needle entered the patient's body, the needle had to be surgically removed)

Vidyanshnewslive
By -
0

अबब ! आजाराचे निदान करण्यासाठी इंजेक्शन दिले, मात्र सुई रुग्णाच्या शरीरात घुसली, शस्त्रक्रिया करून काढावी लागली सुई (Abba!  An injection was given to diagnose the disease, but the needle entered the patient's body, the needle had to be surgically removed)

बल्लारपूर :- येथील ग्रामीण रुग्णालयात आजाराचे निदान करण्यासाठी गेलेल्या रुग्णाला परिचराने (कपाऊन्डर) कंबरेला इंजेक्शन देताना सिरिंजमधून सुई निघून थेट रुग्णाच्या शरीरात घुसली. यामुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. रुग्णाला चंद्रपूर शासकीय दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले व रुग्णाचे ऑपरेशन करून शरीरात घुसलेली सुई काढण्यात आली. ही घटना १ ऑगस्टला घडली असली तरी हा प्रकार ९ ऑगस्टला (बुधवार) उघडकीस आला. इंजेक्शन देताना औषधाच्या दबावामुळे सिरिंजमधून सुई बाहेर पडून संदीपच्या शरीराच्या आत गेली, ही माहिती रुग्णालयाचे डॉ.विजय कळसकर यांना कळताच त्यांनी ताबडतोब शस्त्रक्रिया करून सुई शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र सुई सापडली नाही. नंतर डॉ. विजय कळसकर यांनी २ ऑगस्टला डॉ. अल्लुरवार यांच्या दवाखान्यात जाऊन सिटी स्कॅन केल्यानंतर सुई आत असल्याचे कळले तेव्हा जिल्हा सामान्य रुग्णालयात संदीप आत्राम यांना भरती करून शस्त्रक्रिया करून तरुणाच्या कमरेखाली घुसलेली सुई काढण्यात आली. या घटनेची चौकशी करण्यासाठी सी.एस.डॉ.महादेव चिंचोळे यांनी एक समिती गठीत केली असल्याचे सांगितले आहे. सध्या रुग्ण चंद्रपूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहे. सविस्तर माहिती अशी की १ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता शासकीय दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या शिवाजी वॉर्डातील संदीप आत्राम (३६) या ट्रकचालकाची आरोग्य तपासणी केली. डॉक्टरांनी संदीप आत्राम यांना ठेकेदारीत काम करत असलेल्या इम्रान या कपाऊन्डरला कंबरेला इंजेक्शन देण्यास सांगितले. संदीप आत्राम हा तरुण आता धोक्याबाहेर आहे. या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. यात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)