महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथपाल दिन साजरा, ग्रंथालयाचे जनक पदमश्री एस.आर.रंगनाथन यांच्या जयंती निमित्त अभिवादन Celebrating Librarian Day on behalf of Library Department in Mahatma Jyotiba Phule College, Greetings on the birth anniversary of Padmashri SR Ranganathan, the father of library.

Vidyanshnewslive
By -
0

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथपाल दिन साजरा, ग्रंथालयाचे जनक पदमश्री एस.आर.रंगनाथन यांच्या जयंती निमित्त अभिवादन Celebrating Librarian Day on behalf of Library Department in Mahatma Jyotiba Phule College, Greetings on the birth anniversary of Padmashri SR Ranganathan, the father of library.

बल्लारपूर :- "वाचाल तर वाचाल " या उक्ती प्रमाणे या डिजिटलायझेशनच्या काळातही ग्रंथालयाच महत्व आजही कायम आहे कोणत्याही शहराच्या विकासाचा विचार केला तर भौतिक विकासापेक्षा बौध्दिक विकासाला महत्व असते. याच विषयाला अनुसरून बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात पदमश्री एस. आर.रंगनाथन ग्रंथालय शास्त्राचे जनक यांच्या जयंतीच्या निमित्ताने ग्रंथालय दिन म्हणून साजरा केला जातो यानिमित्ताने सर्वप्रथम माता सरस्वती व एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमांना मान्यवर अतिथींच्या हस्ते पुष्प अर्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी विचारपिठावर प्रमुख अतिथी म्हणून मा. प्रा. डॉ. बादलशाह चव्हाण, प्राचार्य महात्मा फुले महाविद्यालय बल्लारपूर, प्रा.डॉ.रजत मंडल, प्रा.डॉ.पंकज कावरे(ग्रंथालय प्रमुख) ई ची उपस्थिती होती यावेळी विचार व्यक्त करतांना  डॉ.मंडल सर म्हणालेत की, विद्यार्थ्यांनी आधुनिकतेची कास धरताना ग्रंथ सुध्दा वाचन करावीत ग्रंथ आपल्याला दिशा दर्शविण्याच काम करतात. पारंपरिक पध्दतीने अभ्यास करतांना आधुनिकतेलाही जोड द्यावी. तदनंतर आपल्या अध्यक्षीय पदावरून मार्गदर्शन करतांना प्रा.डॉ.बादलशाह चव्हाण म्हणालेत की, प्राचीन काळापासून ग्रंथाचे महत्व असून 6 व्या शतकात जगप्रसिद्ध असलेल्या नालंदा, तक्षशिला व विक्रमशिला सारख्या विद्यापीठांनी ग्रंथालयाचे महत्व अधोरेखित केले. 1930 मध्ये वाराणसी येथे सार्वजनिक स्वरूपात ग्रंथालय स्थापन करण्यात आले तर 1967 पासून महाराष्ट्रात सार्वजनिक स्वरूपात ग्रंथालय स्थापन करण्याला सुरुवात झाली. ग्रंथालय शास्त्राचे जनक एस. आर. रंगनाथन यांचा 9 ऑगस्ट 1892 ला जन्म झाला असून त्यांना फादर ऑफ लायब्ररी सायन्स म्हणुनही ओळखले जाते. शिवाय व्यक्ती हा केवळ आपल्या वास्तव्यासाठी प्रशस्त घर बांधतो मात्र या जगात केवळ पुस्तकासाठी तीन माळ्याच घर बांधणारे एक युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी मुबंईत केवळ पुस्तकासाठी घर बांधले तसेच कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेत असतांना ग्रंथालयाच्या उघडण्यापूर्वी व ग्रंथालय बंद होण्याच्या शेवटच्या वेळ पर्यंत ग्रंथालयात उपस्थित असणारे विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. 


           या कार्यक्रमाचं प्रास्ताविक व संचालन डॉ. पंकज कावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. दिपक भगत यांनी केले. यावेळी प्रामुख्याने प्रा.डॉ. विनय कवाडे, प्रा.डॉ.किशोर चौरे, प्रा.डॉ. रोशन फुलकर, प्रा.डॉ. पल्लवी जुनघरे, प्रा.डॉ. बालमुकुंद कायरकर, प्रा. सतिश कर्नासे, प्रा.स्वप्नील बोबडे, प्रा. ले. योगेश टेकाडे प्रा. शुभांगी भेंडे(शर्मा), प्रा. रोशन  साखरकर, प्रा. दिवाकर मोहितकर, प्रा. सविता पवार,  प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. श्रध्दा कवाडे, प्रा. विभावरी नखाते, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. राजेंद्रकुमार साखरे, यांच्यासोबत शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वर्गाची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यानिमित्ताने ग्रंथालय विभागाच्या वतीने " ग्रंथ प्रदर्शनीच " आयोजन करण्यात आले होते. याकार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)