76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर नगरपरिषदेतर्फ “माझी माती, माझा देश” व “घरोघरी तिरंगा” अभियान, बल्लारपूर नगरपरिषदतर्फ सेल्फी विथ तिरंगा स्पर्धा On the occasion of 76th Independence Day, “Majhi Mati, Maja Desh” and “Groghari Tiranga” campaign by Ballarpur Municipal Council, Selfie with Tiranga Competition by Ballarpur Municipal Council

Vidyanshnewslive
By -
0

76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर नगरपरिषदेतर्फ “माझी माती, माझा देश” व “घरोघरी तिरंगा” अभियान, बल्लारपूर नगरपरिषदतर्फ सेल्फी विथ तिरंगा स्पर्धा On the occasion of 76th Independence Day, “Majhi Mati, Maja Desh” and “Groghari Tiranga” campaign by Ballarpur Municipal Council, Selfie with Tiranga Competition by Ballarpur Municipal Council


बल्लारपूर :- बल्लारपूर नगरपरिषदतर्फ सेल्फी स्पर्धा बल्लारपूर नगरपरिषदेतर्फ स्वातंत्र्याचा अमूर्त महोत्सवअंतर्गत “माझी माती, माझा देश” व “घरोघरी तिरंगा” अभियान राबविले जात आहे. सदर अभियानाच्या जनजागृतीसाठी  पंचप्रण शपथ सेल्फी तसेच तिरंग्यासोबत सेल्फी स्पर्धा राबविली जात आहे. यात सर्वोत्तम सेल्फी घेऊन नगरपरिषदेद्वारे दिल्या गेलेल्या गुगल शीटवर पाठविण्याऱ्या बल्लारपूरमधील भाग्यवान नागरिकास आकर्षक बक्षिस दिले जाणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमाबाबत देशात व राज्यात “मेरी माटी मेरा देश (मिट्टी को नमन, वीरो को वंदन)” अभियान ९ ते ३० ऑगस्टदरम्यान राबविले जाणार आहे. नागरिकांत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम व साक्षरता निर्माण व्हावी व या मातृभूमीसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणांची आहुति देणाऱ्या शूरवीरांचा सन्मान व्हावा हा यामागील उद्देश आहे. नागरिकांनी हातात मातीचे दिवे किंवा माती घेऊन पंचप्रण शपथ घेऊन सेल्फी काढायची आहे. हर घर तिरंगा अभियानात राष्ट्रध्वजाचा पूर्ण सन्मान राखून स्वतःच्या घरी लावलेल्या तिरंग्यासोबतचे क्षण सेल्फीद्वारे टिपून बल्लारपूर नगरपरिषदेद्वारे दिलेल्या https://forms.gle/NUL5o54DYXdS54FdA लिंकवर अथवा बातमीत दिलेल्या QR कोडवर पाठवायचे आहेत. तसेच सेल्फी आपल्या सोशल मिडियावर सुद्धा अपलोड करायची आहे. अपलोड करतांना #BallarpurMunicipalCouncil  #हर_घर_तिरंगा #merimatimeradesh हे सर्व हॅशटॅग वापरणे आवश्यक आहे. सेल्फीमध्ये घर व तिरंगा तसेच मातीचे दिवे अथवा माती हातात घेतली असल्याचे स्पष्ट दिसणे गरजेचे आहे. सेल्फी विथ तिरंगा स्पर्धेसाठी सेल्फी पाठविण्याची अंतिम तारीख १७ ऑगस्ट असुन पंचप्रण शपथ सेल्फी स्पर्धेची अंतिम तारीख ३० ऑगस्ट २०२३ आहे. स्पर्धेनंतर निकाल सर्वाधिक तसेच सर्वोत्तम सेल्फी अपलोड करणाऱ्या व्यक्तीस घोषित करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी बल्लारपूर नगरपरिषदेच्या स्वच्छ बल्लारपूर, सुंदर बल्लारपूर या फेसबुक पेजला भेट द्यावी तसेच स्पर्धेत मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी, तरुण व सर्व वयोगटातील नागरिकांनी यात सहभाग घेण्याचे आवाहन बल्लारपूर नगरपरिषदेतर्फ करण्यात येत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)