अहमदिंना गैर मुस्लिम संबोधू नये : अल्पसंख्याक मंत्रालय (Ahmadis should not be called non-Muslims: Ministry of Minorities)

Vidyanshnewslive
By -
0

अहमदिंना गैर मुस्लिम संबोधू नये  : अल्पसंख्याक मंत्रालय (Ahmadis should not be called non-Muslims: Ministry of Minorities)


चंद्रपूर (अन्सार आली ख़ान) :- अहमदिया मुस्लिम समाजाच्या जिल्हा प्रभारींनी एक प्रेस विज्ञप्ति प्रकाशित करून म्हटले आहे की, भारतातील एका प्रांतातील वक्फ बोर्डाच्या वतीने एका मुस्लिम संघटनेने जारी केलेल्या फतव्याच्या आधारे अहमदिया मुस्लिम समुदायाला गैर-मुस्लिम घोषित करण्यात आले. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने या संदर्भात कारवाई केली आहे आणि अहमदीयांविरूद्धचा हा निर्णय बेकायदेशीर आणि असंवैधानिक असल्याचे घोषित केले आहे, ज्यासाठी अहमदिया मुस्लिम समुदाय भारत मंत्रालयाचे मनापासून आभारी आहे. आपला भारत देश हा लोकशाहीप्रधान देश आहे आणि या देशाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे विविध जाती  आणि धर्माचे लोक परस्पर प्रेमाने आणि बंधुभावाने राहतात. आणि भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक मानवाला स्वतःला वाटेल त्या धर्मात राहण्याचा अधिकार आहे. असे असतानाही काही मुस्लिम संघटना आणि वक्फ बोर्ड अहमदिया मुस्लिम समाजाचे धार्मिक अधिकार काढून घेण्याची कारवाई करतात. देशातील शांततापूर्ण वातावरण बिघडवण्याचा आणि अहमदिया मुस्लिम समाजाच्या विरोधात लोकांना भडकवण्याचा  हा थेट प्रयत्न आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)