ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत मोहुर्ली वनपरिक्षेत्रात जागतिक व्याघ्र दिन उत्साहात साजरा ! (World Tiger Day celebrated in Mohurli forest area under Tadoba-Andhari Tiger Reserve !)

Vidyanshnewslive
By -
0

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत मोहुर्ली वनपरिक्षेत्रात जागतिक व्याघ्र दिन उत्साहात साजरा ! (World Tiger Day celebrated in Mohurli forest area under Tadoba-Andhari Tiger Reserve !)


चंद्रपूर :- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत मोहर्ली बफर वनक्षेत्रात दिनांक 29/07/2023 रोजी मोहर्ली प्रवेशद्वार येथील मिटिंग हॉल येथे जागतीक व्याघ्र दिवस साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमामध्ये मा. डॉ. जितेंद्र रामगावकर, क्षेत्र संचालक तथा वनसंरक्षक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, मा. श्री. कुशाग्र पाठक, उपसंचालक (बफर), ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, मा. श्री. महेश खोरे, सहाय्यक वनसंरक्षक (कोअर), ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, मा. श्री. बंडू धोतरे, अध्यक्ष ईको-प्रो. व मोहर्ली (बफर) या वनपरिक्षेत्रातील श्री. संतोष थिपे, वनअधिकारी मोहर्ली व क्षेत्रीय वनकर्मचारी, PRT सदस्य, ईको विकास समितीचे अध्यक्ष व सरपंच तसेच पर्यटन मार्गदर्शक, जिप्सी मालक/चालक, रिसोर्ट धारक, होम स्टे धारक व ग्रामस्त यांनी सहभाग घेतला होता. सदर कार्यक्रमामध्ये मा. डॉ. जितेंद्र रामगावकर, क्षेत्र संचालक तथा वनसंरक्षक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर यांनी व्याघ्र दिनानिमित्य मार्गदर्शनामध्ये जगाच्या एकूण वाघांच्या संख्यापैकी 70% वाघ हे भारतात असून त्यातील अधिकांश बाघ है ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आहे. भविष्यात वाघाची संख्या वाढल्यास ज्या प्रकल्पात वाघ नसेल त्या प्रकल्पात वाघांना स्थलांतरीत करून चंद्रपूर जिल्हा हा वाघांना स्थलांतरित करणारा एकमेव जिल्हा म्हणून ओळखल्या जाईल. तसेच याकरिता वनअधिकारी, वनकर्मचारी, मार्गदर्शक व ग्रामस्त यांची भूमिका महत्वाची राहतील असे सांगितले. त्यानंतर श्री. बंडू धोतरे, अध्यक्ष ईको-प्रो यांनी आपल्या मार्गदर्शनात वाघाच्या वाढत्या संख्येने मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना मोठ्या प्रमाणात होत असून सुद्धा ग्रामस्थांचे मोठ्याप्रमाणात सहकार्य लाभत आहे. यावरून चंद्रपूर जिल्हा वाघाच्या बाबतीत संवेदनशील असल्याचे सांगितले. जागतिक व्याघ्र दिनानिमित्त केक कापून व सायकल रॅली काढून तसेच वाघाविषयी चित्रफित दाखवून जनजागृती करण्यात आली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717078

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)