राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या विरोधात बल्लारपुरात कॉंग्रेस पक्षाचे निषेध आंदोलन Congress party protest movement in Ballarpur against Sambhaji Bhide who made baseless statement against Father of Nation Mahatma Gandhi.

Vidyanshnewslive
By -
0

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या विरोधात बल्लारपुरात कॉंग्रेस पक्षाचे निषेध आंदोलन Congress party protest movement in Ballarpur against Sambhaji Bhide who made baseless statement against Father of Nation Mahatma Gandhi.


बल्लारपूर :- शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक व कट्टर हिंदुत्ववादी असलेले संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केल्यामुळं अवघ्या देशभरात निषेध व्यक्त करण्यात येत आहे या अनुषन्गाने बल्लारपूर शहरात शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील नगर परिषद चौक परिसरात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा कॉंग्रेसच्या सूचनेनुसार बल्लारपूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने नगर परिषद परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शनिवारी सायंकाळी 4:00 वाजता सदर आंदोलनाचं आयोजन करण्यात आले होते या आंदोलनाला मोठ्या संख्येने कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते प्रदेश कॉंग्रेसचे प्रतिनिधी घनश्याम मुलचंदानी, शहराध्यक्ष अब्दुल करीम, देवेंद्र आर्य, माजी गट नेते, एड. मेघा भाले ई नी या निषेध सभेला संबोधित केले. या निषेध आंदोलनात सुनंदा आत्राम, माजी नगराध्यक्ष, अफसाना सय्यद, तालुका महिला अध्यक्ष, छाया शेंडे, दौलत बुंदेल, नरसिंग रेब्बावार, नरेश मुंदळा, विनोद आत्राम, मेहमूद पठाण, प्रितम पाटील,   डॉ. युवराज भसारकर, महेश सदाला, शेख बाबू, सुयोग नळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्याची उपस्थिती होती. या सभेचे संचालन एड. मेघा भाले शहर महिलाध्यक्ष बल्लारपूर यांनी केले यावेळी संभाजी भिडे यांच्या पोस्टरला प्रतिकात्मक स्वरूपात जोडे मारो जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)