ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हाभरात 4 हजाराच्या वर नागरिकांचं रक्तदान, तर बल्लारपुरात 250 नागरिकांनी रक्तदान केल्याची सूत्रांची माहिती (On the occasion of Sudhirbhau Mungantiwar's birthday, over 4,000 citizens donated blood in the district, while 250 citizens donated blood in Ballarpur, according to sources.)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून राजकारणात नेत्रदीपक यश मिळविणार्‍या राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य मंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस जिल्ह्यातील हजारो लोकांनी रक्तदान करून रविवारी साजरा केल्याने हा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला आहे. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवारातर्फे संपूर्ण जिल्ह्यात सुधीर मुनगंटीवार यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून पालकमंत्री महा रक्तदान यज्ञाचे आयोजन करण्यात आले. यात चंद्रपूर, वरोरा, बल्लारपूर, पोंभुर्णा, मूल, गोंडपिपरी, राजुरा तालुका येथील भाजपा कार्यकर्त्यांनी हिरीरीने भाग घेतला. आयोजकांनी रक्तदात्यांसाठी एक शपथपत्र तयार केले. या शपथपत्रानुसार यानंतर हे रक्तदाते गरजूंना रक्तदान करून सामाजिक ऋण फेडणार आहेत. तसेच लोकजागृती करून इतरांनाही ते प्रोत्साहन देतील. सर्व रक्तदात्यांना शासकीय प्रमाणपत्र व मुनगंटीवार यांचे एक अभिनंदन पत्र देण्यात आले. विशेष म्हणजे बल्लारपूर शहरात जवळपास 250 नागरिकांनी रक्तदान केल्याची माहिती असून चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 4 हजार नागरिकांनी या महारक्तदान शिबिरात सहभाग घेतला आहे हे अभियान यशस्वी करण्यासाठी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, डॉ. मंगेश गुलवाडे, काशिनाथ सिह, सतविंदर सिंग दारी, मनीष पांडे, देवेंद्र वाटकर, राजू दासरवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)