वेस्टन कोलफिल्ड लिमिटेड द्वारे बल्लारपुरातील राष्ट्रीय स्तर व राज्यस्तरावर यश मिळविणाऱ्या खेळाडूंचा सत्कार Weston Coalfield Ltd felicitated sportspersons who achieved national and state level in Ballarpur

Vidyanshnewslive
By -
0

वेस्टन कोलफिल्ड लिमिटेड द्वारे बल्लारपुरातील राष्ट्रीय स्तर व राज्यस्तरावर यश मिळविणाऱ्या खेळाडूंचा सत्कार Weston Coalfield Ltd felicitated sportspersons who achieved national and state level in Ballarpur


बल्लारपूर :- बल्लारपूर येथील वेस्टन कोलफिल्ड्स  लिमिटेड द्वारे झंकार महिला मंडळ आणि शिवानी महिला मंडळ यांच्यातर्फे बल्लारपूर येथील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला बल्लारपूर स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशनचे खेळाडू ज्यांनी राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉल आणि अनेक खेळांमध्ये आपले नाव कमविले अशा खेळाडूंचा महिला मंडळाद्वारे सत्कार करण्यात आला. बीएसए चे खेळाडू आस्था ढोंगळे,  प्रेरणा अलोने, आर्शिका मेश्राम, अरसिया पठाण, आचल कोडापे,  राखी वाघाडे, अनुष्का फरकाड़े, इशिका लोखंडे, वैष्णवी रागीट आणि साक्षी कुंभे या खेळाडूंचा सहभाग होता. या सत्कार सोहळ्याकरिता नागपूरचे प्रमुख अतिथी आदरणीय अनिता अग्रवाल मॅडम, रीना कुमार मॅडम, आभा द्विवेदी मॅडम, इंदू सिंग मॅडम आणि सोनाली म्हेत्रे मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सर्वेसर्वा  वेल्फेअर इन्चार्ज आदरणीय सविता मॅडम  प्रामुख्याने उपस्थित होत्या. खेळाडूंना भविष्यासाठी शुभेच्छा देत उत्तरोत्तर प्रगती खेळामध्ये करावी याकरिता सगळ्यांनी आपापल्या भाषणामध्ये सांगितले. वेस्टन कोल्फील लिमिटेड द्वारे बल्लारपुरात अशा प्रकारचे उपक्रम नेहमीच सुरू असतात.  मुलींचा खेळामध्ये सहभाग वाढावा या उद्देशाने हा खेळाडूंचा सत्कार सोहळा कार्यक्रम घेण्यात आला व सर्व खेळाडूंना स्पोर्ट्स ट्रॅकसूट देण्यात आले. बल्लारपूर स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन तसेच महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातर्फे खेळाडु करिता अशा प्रकारचा उत्कृष्ट सत्कार सोहळा घेतल्याबद्दल वेस्टन कोलफिल्ड लिमिटेड चे आभार व्यक्त करण्यात आले तसेच मनःपूर्वक धन्यवाद देण्यात आले. वॉलीबॉलचे प्रशिक्षण महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे दररोज सकाळी आणि सायंकाळी सुरू असते . त्याकरिता ज्यांना प्रशिक्षण घ्यायचे आहे त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय शिवाजी वॉर्ड बल्लारपूर येथे संपर्क साधून आपले प्रशिक्षण सुरू करावे. असे  बीएसए चे मार्गदर्शक यांनी सर्वांना आवाहन केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)