मणिपूर 2 महिलांच्या अत्याचार प्रकरणात सर्वोच्च न्यायालय दखल घेण्याच्या तयारीत, सरकारला कारवाई करण्याचे निर्देश (Supreme Court prepares to take cognizance of Manipur 2 women's rape case, directs government to take action)

Vidyanshnewslive
By -
0

मणिपूर 2 महिलांच्या अत्याचार प्रकरणात सर्वोच्च न्यायालय दखल घेण्याच्या तयारीत, सरकारला कारवाई करण्याचे निर्देश (Supreme Court prepares to take cognizance of Manipur 2 women's rape case, directs government to take action)

वृत्तसेवा :- मणिपूरमधील हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, "आम्ही सरकारला कारवाई करण्यासाठी थोडा वेळ देऊ, अन्यथा आम्हीच पावले उचलू. कालचा व्हिडीओ पाहून आम्ही व्यथित झालो आहोत. या प्रकाराबाबात आम्ही चिंता व्यक्त करतो. सरकारने पुढे येऊन पावलं उचलली पाहिजेत आणि कारवाई केली पाहिजे." असे कडक आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले होते. न्यायालयाच्या या निर्देशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मणिपूर हिंसाचारावर प्रतिक्रिया देत आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. याच मुद्दावरून आता राष्ट्रवादीने पंतप्रधानांवर टीका केली आहे. मणिपूर हिंसाचारावर प्रतिक्रिया देताना विद्या चव्हाण म्हणाल्या, "गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूर जळतंय. मणिपूरमध्ये अत्याचार होत आहेत, जाळपोळ केली जात आहे. मणिपूरमध्ये डबल इंजिन असलेलं मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. हे सरकार काहीही करत नाही. काल जो व्हिडीओ व्हायरल झाला, त्यामध्ये सगळं दिसतंय की, दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली आहे. त्या महिलांवर सामूहिक अत्याचार झाले आहेत." जेव्हा देशातील सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची दखल घेतली, तेव्हा मोदींचं तोंड उघडलं. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' असा मोदी सरकारचा नारा आहे. पण आज देशातील महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. तरीही मोदी सरकार गप्प का आहे? असा प्रश्न आम्हाला पडलाय. महिलांमध्ये सरकारविरोधात संताप आणि चीड आहे," असंही चव्हाण यांनी नमूद केलं.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)