ईशाळगडावर दरड कोसळली, आक्रोश व मातम पसरला असून प्राथमिक माहितीनुसार 7 नागरिकांचा मृत्यू, मदत व बचाव कार्य युध्दस्तरावर सुरु (Crack fell on Ishalgarh, outcry and mourning spread and according to preliminary information 7 civilians died, relief and rescue work started on war footing.)

Vidyanshnewslive
By -
0

ईशाळगडावर दरड कोसळली, आक्रोश व मातम पसरला असून प्राथमिक माहितीनुसार 7 नागरिकांचा मृत्यू, मदत व बचाव कार्य युध्दस्तरावर सुरु (Crack fell on Ishalgarh, outcry and mourning spread and according to preliminary information 7 civilians died, relief and rescue work started on war footing.)

वृत्तसेवा :- खालापूर येथील इर्शाल गडावरील चौक गावापासून सहा किलोमीटर डोंगर भागात आदिवासी वस्तीवर दरड कोसळल्याने भयंकर दुर्घटना घडली आहे. रात्री गावातील लोक झोपलेले असतानाच डोंगर कडा तुटल्याने संपूर्ण गाव या डोंगर कड्याखाली दबला गेला. काल रात्री 10.30 ते 11 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. 250 ते 300 लोक वस्तीचं हे गाव आहे. आदिवासी ठाकूर समाजाची ही वस्ती आहे. गेल्या दोन दिवसांपासून या परिसराला पावसाने चांगलेच झोडपले होते. काल रात्री सर्वजण झोपेत असताना अचानक दरड कोसळल्याने या दरडीखाली 50 ते 60 घरे दबली गेली आहेत. रात्री हा प्रकार घडल्याने एनडीआरएफची दोन पथके, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनीही रेस्क्यू टीमला मदतकार्यात मदत केली. या दुर्घटनेत आतापर्यंत चारजणांचा मृत्यू झाला आहे. तर दरडीखाली 50 ते 60 घरे आणि तब्बल 100 ते 200 लोक दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 25 लोकांना या दरडीखालून काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आलं आहे. दरम्यान, रात्रीचा अंधार, धुकं आणि पावसामुळे अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीमला मदतकार्य करण्यास अडथळे येत होते. मात्र, तरीही रेस्क्यू टीमने रात्रभर जागून मदतकार्य केले. पहाट होताच पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. उद्योगमंत्री उदय सामंत रात्रीच घटनास्थळी पोहोचले आहेत. तर गिरीश महाजन हे पहाटे घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दादा भुसे काही वेळात घटनास्थळी पोहोचणार आहेत. या गावात अनेक लहान मुले होती. ही मुले रात्री झोपी गेली होती. डोंगर कडा कोसळल्याने मोठ्या माणसांना पळ काढता आला. पण लहान मुलांना पळता आलं नाही. त्यामुळे या दुर्घटनेत लहान मुले मोठ्या प्रमाणावर दगावल्याचं सांगितलं जात आहे. ही घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर वाडीतील लोकांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. बदलापूरहूनही एक कुटुंब आपल्या मुलीचा शोध घेण्यासाठी आलं आहे. अनेकांच्या नातेवाईकांनी तर घटनास्थळी येताच समोरचं दृश्य पाहून टाहो फोडला. या दुर्घटनेत कुणाची मुलगी, कुणाचा जावई, कुणाचा मुलगा तर कुणाचे आईवडील दगावले आहेत. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)