महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात मतदार जागृती कार्यक्रम, नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन (Voter awareness program in Mahatma Jyotiba Phule College, appeal to new voters to register their names in the voter list)

Vidyanshnewslive
By -
0

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात मतदार जागृती कार्यक्रम, नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन (Voter awareness program in Mahatma Jyotiba Phule College, appeal to new voters to register their names in the voter list)


बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात इतिहास व राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त माध्यमातून मतदार जागृतीचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 31 जुलै 2023 ते 31 ऑगस्ट 2023 पर्यंत 1 जानेवारी 2024 ला वयाची 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या भारतीय नागरिकाचे मतदार यादीत नाव नोंदविण्याचा कार्यक्रम सुरू असून या मतदार जागृतीच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा. महेंद्र फुलझेले, नायब तहसीलदार बल्लारपूर, प्रा.डॉ.किशोर चौरे, प्रा.डॉ. रोशन फुलकर, ई ची विचार पिठावर उपस्थिती होती. यावेळी वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या तसेच वयाची 18 वर्ष सुरु असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी मतदार यादीत आपलं नाव नोंदवावे तसेच ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरूपातही विद्यार्थी आपले नाव नोंदवू शकतील यासोबतच प्रत्येक विद्यार्थ्यांनी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजवावा. ज्यामुळं भारतात लोकशाही शासन व्यवस्था टिकून रहायला मदत होईल. यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी नाव नोंदणीसाठी नमुना-6 फॉर्म उपलब्ध करून दिल्याची माहितीही मा. महेंद्र फुलझेले, नायब तहसीलदार बल्लारपूर यांनी दिली तसेच विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडणारी अधिवास प्रमाणपत्र (डोमिसियल), जातीचे प्रमाणपत्र(कास्ट) ई साठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती सुध्दा संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी विचारपीठावर उपस्थित असलेल्या प्रा.डॉ.रोशन फुलकर व ई नी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचं संचालन व आभार प्रदर्शन प्रा.डॉ. किशोर चौरे यांनी केले या कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रा.डॉ.विनय कवाडे, प्रा.डॉ.बालमुकुंद कायरकर, प्रा.डॉ.पंकज कावरे, प्रा.डॉ.पल्लवी जुनघरे, प्रा.डॉ.रजत मंडल, प्रा. सतिश कर्नासे, प्रा. शुभांगी भेंडे(शर्मा), प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. योगेश टेकाडे, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. दिपक भगत, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. श्रध्दा कवाडे, प्रा. विभावरी नखाते, ई यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)