Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

धक्कादायक ! राजुऱ्यात गोळीबार, भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पत्नीचा मृत्यू तर एक गंभीर जखमी असल्याचं वृत्त, Shocking! Firing in Rajur, Bharatiya Janata Yuva Morcha district vice president's wife killed and one seriously injured, report

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारात भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या पत्नी पूर्वाशा सचिन डोहे (27) यांचा मृत्यू झाला आहे. शेजारी असणारे कोळसा व्यापारी लल्ली शेरगिल हे या गोळीबारात गंभीर जखमी झाले आहेत. कोळसा तस्करीतून हा गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे. रात्री उशिरा आरोपीने पोलिसांसमोर शरणागती पत्करली. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरातील सोमनाथपूर वॉर्डत रविवारी रात्री घडली. राजुरातील सोमनाथपूर वॉर्डमधील भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या घरी रविवारी रात्री 8 ते 8:30 वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. गोळी लागून सचिन डोहे यांची पत्नी पूर्वाशा सचिन डोहे (27) यांचा मृत्यू झाला तर शेजारी राहत असलेले कोळसा व्यापारी लल्ली शेरगिल हे यात गंभीर जखमी झाले. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. पोलिसांनी आरोपीचे नाव जाहीर केले नाही. या घटनेत जखमी झालेले लल्ली शेरगिल यांना उपचारासाठी चंद्रपुरात हलविण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या