गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप, गुणवंताना प्रेरित करणे हे आपले कर्तव्य - प्रा महेश पानसे. (A pat on the back of the meritorious, it is our duty to inspire the meritorious - Prof. Mahesh Panse.)

Vidyanshnewslive
By -
0

गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप, गुणवंताना प्रेरित करणे हे आपले कर्तव्य - प्रा महेश पानसे. (A pat on the back of the meritorious, it is our duty to inspire the meritorious - Prof. Mahesh Panse.)


नागभिड :- गुणवंताना प्रेरित करणे व त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन प्रोत्साहित करणे हे आपले कर्तव्य असून यातून ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थी जिद्दीने पुढे जाऊन लौकिकास पात्र होतात असे मत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश  पानसे यांनी व्यक्त केले. तालक्यातील मिंथूर येथे आयोजीत गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळयात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. ईश्वर - रखुमाई चव्हाण स्मृती प्रिर्थत्य दरवर्षी प्रमाणे यंदाही हा शानदार सत्कार सोहळा येथील समाज भवन सभागृहात शेकडो गुणवंत विद्यार्थी  व पालकांच्या उपस्थीतीत संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. शर्मिलाताई रामटेके, सरपंच नवेगाव, नरेंद्र चुऱ्हे मुख्याध्यापक ने.ही.विद्यालय. विशाखाताई डोंगरे सरपंच मिंथूर, आयोजक रतिरामजी चव्हाण, अरूणजी चव्हाण उपस्थीत होते. या सोहळयात इयत्ता १० व १२ मध्ये गुणवंत ठरलेल्या ४० विदयार्थी व  विद्यार्थिनी यांना स्म्रुतिचिन्ह, प्रमाणपत्र, शालेय वस्तू व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. इयत्ता १२ मधून नंदिनी रडके प्रथम, व द्धितीय क़मांकाची मानकरी मयूरी खोकले ठरली. इयत्ता १० मधून अभिषेक कुळे प्रथम व फाल्गुनी भोयर द्धितीय पुरस्काराचे मानकरी ठरले.  यावेळी "बुद्ध व त्यांचा धम्म" या ग्रथावर आधारीत घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल घोषीत करून गुणानुक्रमे तिन विजेत्यांना रोख रक्कम व भेट वस्तू देण्यात  आल्यात उपस्थीत  पाहुण्यांनी  विदयार्थी व पालकांना शुभेच्छा  देऊन मार्गदर्शन केले. २०१७ पासून चव्हाण परिवार गुणवंताच्या पाठीवर शाबासकीची थाप देत आपली सामाजीक बाधिलकी जोपासत आहेत हे विशेष. या सोहळयाचे प्रास्ताविक रतिरामजी चव्हाण तर सुंदर संचालन प्रज्ञा चव्हाण व आभार प्रदर्शन प्रिती कांबळे हिने मांडले. परिसरातील विदयार्थी, पालक मान्यवर यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)