निवडणूक आयोगाचे संकेत, येत्या सप्टेंबर - ऑक्टोम्बरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होण्याची शक्यता ! The Election Commission's signal, the possibility of local self-government elections in the coming September-October!

Vidyanshnewslive
By -
0

निवडणूक आयोगाचे संकेत, येत्या सप्टेंबर - ऑक्टोम्बरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होण्याची शक्यता ! The Election Commission's signal, the possibility of local self-government elections in the coming September-October!

वृत्तसेवा :- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना अधिक वेग आले आहे. आगामी निवडणुकांची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी सर्वच पक्षांची लगबग सुरू झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या रखडले गेले होते. राज्य निवडणूक आयोगाच्या राजपत्रामध्ये या निवडणुकीचा उल्लेख केला गेला आहे. यामुळे लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडण्याची चिन्हे दिसत आहेत. या वर्षाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची चिन्हे दिसत आहेत. या निवडणुकींचा उल्लेख राज्य निवडणूक आयोगाच्या राजपत्रातमध्ये नमूद करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुकासाठी मतदार याद्या अंतिम करण्यासाठी अधिसूचना काढण्यात येईल, असा उल्लेखही यामध्ये नमूद करण्यात आले आहे. आता खुद्द राज्य निवडणूक आयोगानेच एकप्रकारे निवडणूक लागण्याचे संकेतच दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्या लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल मोठे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा निकाल रखडला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय लागतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.ओबीसी आरक्षणाचा अद्याप प्रलंबित निकाल लागला नाही, तर राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई-पुण्याह राज्यातील ११ महापालिकांची मुदत गेल्या वर्षी १५ मार्च रोजी संपली आहे. तर महापालिकेची मुदत संपून दोन वर्षांचा काळ लोटला आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)