आंबेडकरी चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते ज्येष्ठ साहित्यिक एल. आर. बाली यांना बल्लारपुरात श्रध्दांजली अर्पण (Active activist of Ambedkari movement, senior writer L. R. Bali Homage at Ballarpur)

Vidyanshnewslive
By -
0

आंबेडकरी चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते ज्येष्ठ साहित्यिक एल. आर. बाली यांना बल्लारपुरात श्रध्दांजली अर्पण (Active activist of Ambedkari movement, senior writer L.  R. Bali Homage at Ballarpur)

बल्लारपूर :- जालंधर येथील प्रख्यात आंबेडकरी चळवळीतले अग्रेसर राहून स्वतःला वाहून नेणारे सच्चे कार्यकर्ते ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, आंबेडकरी विचारवंत, भीम पत्रिका या मासिकाचे संपादक तसेच समता सैनिक दलचे राष्ट्रीय कमांडर आदरणीय एल. आर. बाली यांचे 94 व्या वर्षी दुःखद निधन झाले. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनात त्यांनी हिरहिरीने भाग घेऊन स्वतःची नोकरी सुद्धा सोडून चळवळीमध्ये आणि बाबासाहेबांच्या विचारांना सर्व परी प्रसार करण्याकरिता स्वतःला झोकून घेतले. असे निर्भीड वक्ते, निर्भीड भीमसैनिक, निर्भीड साहित्यिक लेखक आदरणीय एल.आर. बाली यांना श्रद्धांजली देण्याकरिता बल्लारपूर येथील विश्रामगृहात आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी शोकसभेचे आयोजन केले त्यामध्ये अध्यक्षस्थानी समता सैनिक दल चे मार्शल माननीय ताराचंद रायपुरे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता भारत जी थूलकर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन अरुण घायवान तसेच प्रकाश घायवान, अशोक भावे, प्रसाद चव्हाण, विशाल डुंबेरे, मनोहर दोतपेल्ली, कृष्णमूर्ती रामटेके, प्रशांत सातकर ,धर्मेंद्र गायकवाड , दूरेश  तेलंग, मधुकर उमरे, ईश्वर देशभ्रतार,  अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहून माननीय एल. आर. बाली यांच्या कार्यावर उजाळा देत दुःख व्यक्त केलं. बालीसाहेबांच्या अचानक निधनामुळे आंबेडकरी चळवळीतील ही पोकळी कधीही भरून निघणार नाही असे विधान भारत थूलकर यांनी संबोधले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)