बल्लारशाह रेल्वे स्थानकावर नवीन पूल मंजूर, मार्च 2024 पर्यंत पूल पूर्ण होण्याची शक्यता, वस्ती विभागातील नागरिकांना रेल्वे स्थानकावर येणं सोपं होईल New bridge at Ballarshah railway station approved, bridge likely to be completed by March 2024, easy access to railway station for basti area dwellers

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- बल्लारशाह रेल्वे स्थानकावर आणखी एक फूट ओव्हर ब्रिज एफओबीसाठी मंजूर करण्यात आला असून त्याची निविदा काढण्यात आली आहे. हा १२ मीटर रुंद पूल मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होऊन प्रवाशांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ विभागीय अभियंता (दक्षिण) मध्य रेल्वे नागपूर यांनी मंजुरी दिली आहे. ही बाब पुष्टी आहे. या रेल्वे पुलावर एस्केलेटर आणि स्लॅबची सुविधा असेल जेणे करून वृद्ध, अपंग आणि रुग्णांची सोय होईल. हा पूल दुतर्फा असेल, एका बाजूला स्लॅब असेल आणि दुसऱ्या बाजूला एस्केलेटर असतील. तो वस्तीकडे जाणाऱ्या जुन्या पुलाला जोडला जाईल. त्यामुळं वस्ती विभागातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची सोय होईल. हा पूल सध्याच्या रेल्वे पोलीस जीआरपीजवळ बांधण्यात येणार आहे. याशिवाय बल्लारशाह रेल्वे स्थानकावर काजीपेठ एन्डच्या दिशेला चवथा पूल ही प्रस्तावित आहे. अशी माहिती अजय दुबे सदस्य: राष्ट्रीय रेल्वे ग्राहक सल्लागार परिषद, NRUCC रेल्वे मंत्रालय नवी दिल्ली बल्लारशाह यांनी दिली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)