चंद्रपूरसह जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली, इरई धरणाच्या 3 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु, जिल्ह्यातील अनेक मार्ग पाण्याखाली ! (A flood situation has arisen in the district along with Chandrapur, water has been released from 3 gates of Irai dam, many roads in the district are under water!)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूरसह जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली, इरई धरणाच्या 3 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु, जिल्ह्यातील अनेक मार्ग पाण्याखाली ! (A flood situation has arisen in the district along with Chandrapur, water has been released from 3 gates of Irai dam, many roads in the district are under water!)



चंद्रपूर :- राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मुसळधार पावसामुळे इरई धरणातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणाचे सात पैकी दोन दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे साचलेल्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. अनेक नागरिक घरात अडकले असून पुरातून १४० लोकांना रेस्क्यू करण्यात यश आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. चंद्रपूर शहराजवळील इरई आणि झरपट नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. राजनगर आणि सहारा पार्क भागात इरई नदीचे पाणी शिरले असून या भागातील घरांना आठ ते दहा फूट पाण्याचा वेढा आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने पूरग्रस्त भागातून लोकांना काढण्यास सुरुवात केली आहे. सध्या सध्या चंद्रपुर शहरामध्ये पूराने हाहाकार माजवला आहे. या ठिकाणी २४ तासांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. पूरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे पैनगंगा- वर्धा नदीपट्टा, माणिकगड डोंगर आणि सखल मैदानी प्रदेशातील शेत पिकांना याचा फटका बसला आहे. अनेक मार्ग ठप्प पडले असून गावांचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील थिपा, आवारपूर, हिरापूर अंतरगाव, सांगोडा, वनोजा आदी गावालगतच्या शेत शिवारातील कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, भाजीपाला आदी पिकाचे अति पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी वर्ग संकटात आला आहे. विशेष म्हणजे पाण्याच्या पातळीत सतत वाढ होत असून राजुरा-बल्लारपूर, सास्ती-बल्लारपूर, वस्ती विभागातील गोल पुलात पाणी असल्यामुळं वस्ती विभागाचा संपर्क तुटला आहे तसेच बल्लारपूर-विसापूर-नांदगाव मार्ग पाण्याखाली गेला आहे सद्यस्थितीत वर्धा नदीच्या पाण्याची पातळी ही नियंत्रणात आहे मात्र असाच पाऊस सुरु राहिल्यास परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)