गडचिरोलीच्या दुर्गम भागातील ' लेडी ड्राइवर ' म्हणून परिचित असलेली किरण उच्च शिक्षणासाठी इंग्लडला जाणार, शासनाच्या माध्यमातून शिष्यवृत्तीच्या स्वरूपात पूर्ण होईल किरणचे स्वप्न ! (Kiran, who is known as the 'lady driver' of the remote area of ​​Gadchiroli, will go to England for higher education, Kiran's dream will be fulfilled in the form of a scholarship through the government !)

Vidyanshnewslive
By -
0

गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम रेगुंठा येथील 'लेडी ड्रायव्हर' म्हणून ओळख असलेली किरण कुर्मा हिचे इंग्लंडला जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. अतिदुर्गम रेगुंठा ते सिरोंचापर्यंत काळीपिवळी (टॅक्सी) चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी किरण कुर्मा या २४ वर्षीय युवतीला राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागाने ४० लाख रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली आहे. या शिष्यवृत्तीच्या मदतीने ती इंग्लंड देशातील लंडनमध्ये इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंट हा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून दोन वर्षे एखाद्या कंपनीत काम करणार आहे. त्यानंतर ती देशात परत येणार आहे. रेगुंठा हे गाव सिरोंचा तालुकास्थळापासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर आहे. किरण ही उच्चविद्याविभूषित असून तिने तेलंगणा राज्यातील हैदराबाद राज्यातील उस्मानिया विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. अर्थशास्त्र या विषयात ती एम.ए. आहे. शिक्षण घेतल्यानंतर रोजगाराचे साधन म्हणून तिने रेगुंठा ते सिरोंचा दरम्यान काळीपिवळी चालविण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तिच्याकडे एकच टॅक्सी होती. किरण कुर्माने मित्रांच्या मदतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थेट विधानसभेच्या कार्यालयात भेट घेतली. तिने मुख्यमंत्र्यांकडे आपली इंग्लंडमध्ये शिकण्याची इच्छा व्यक्त करतानाच आपल्या कमकुवत आर्थिक परीस्थितीचीही माहिती दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी लगेच समाजकल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे यांना फोन करून किरणला मंत्रालयात जाण्यास सांगितले. किरण सचिवांकडे पोहोचेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी व्हाट्सअपद्वारे भांगे यांच्याकडे अर्ज पाठविला. भांगे यांनी तेव्हाच गडचिरोलीच्या समाजकल्याण अधिकाऱ्यांना फोन करून किरणचा प्रस्ताव तत्काळ मंत्रालयात पाठविण्याचे निर्देश दिले. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)