महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात यश मिळविणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सत्कार तर 11 वीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत (Mahatma Jyotiba Phule College felicitated the 12th students and welcomed the 11th students)

Vidyanshnewslive
By -
0

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात यश मिळविणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सत्कार तर 11 वीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत (Mahatma Jyotiba Phule College felicitated the 12th students and welcomed the 11th students)


बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयाच्या कॉमर्स विभागातील इंग्रजी माध्यमाच्या प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा बारावी मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करून नावलौकिक केले अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला प्रमुख अतिथी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक मोहितकर सर, इंग्रजी माध्यमाचे मसादे मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर चव्हाण सर यांनी भूषविले. प्रास्ताविक मसादे मॅडम यांनी केले,  त्यांनी प्रास्ताविकेमध्ये मागील चार वर्षापासून इंग्रजी माध्यमाची जी सरशी होत आहे त्याबद्दल समाधान व्यक्त केले. शिवानी रजक या विद्यार्थिनीने पाच विषयांमध्ये 90 च्या वर गुण प्राप्त केल्याबद्दल सर्वांनी तिचे अभिनंदन केले.  मराठी माध्यमाचे विद्यार्थी धनवलकर आणि मेश्राम यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. प्राध्यापक मोहितकर सर यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना भविष्यात उत्कृष्ट प्रगती करण्याच्या शुभेच्छा दिल्या आणि महाविद्यालयातर्फे आवश्यक सर्व सहकार्य मिळेल असे आश्वासन दिले. त्यानंतर कुमारी शिवानी रजक या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की कॉमर्स विभागामध्ये नागपूरला कंपनी सेक्रेटरी चा कोर्स सुरू असून त्यासाठी ती प्रयत्न करत आहे. महाविद्यालयाचे तिनेआभार मानले. त्यानंतर अध्यक्षीय भाषणामध्ये डॉक्टर चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आणि शिस्त आणि संस्कार याची जोड असणे आवश्यक असल्याचे सांगितले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. अकरावी कॉमर्स इंग्रजी माध्यमाच्या  विद्यार्थ्यांचाही महाविद्यालयामध्ये स्वागत समारंभ घेण्यात आला. ज्यामध्ये विध्यार्थी  नवीन ठिकाणी आल्याचे समाधान चेहऱ्यावर दिसत होते. कार्यक्रम महाविद्यालयातील हॉलमध्ये पार पडला, त्यावेळी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय चे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका प्रामुख्याने उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)