धक्कादायक ! सेट परिक्षेचा निकाल फुटल्याची चर्चा, एका ई-मेल मूळ विद्यार्थ्यात संभ्रमाची स्थिती, मात्र परिक्षा विभागाकडून सारवासारव निकाल जाहीर होईपर्यंत प्रतिक्षा करण्याचं आवाहन (Shocking! Talks about set exam results being leaked, an e-mail source of confusion among students, but appeals to wait till the summary results are announced by the examination department.)

Vidyanshnewslive
By -
0

पुणे :- आजपर्यंत तुम्ही प्रश्नपत्रिका फुटल्याचे ऐकले असेल, पण प्रथमच परीक्षेचा निकाल फुटल्याची बातमी समोर आली आहे. प्राध्यापक पदासाठीची राज्य पात्रता परीक्षेचा निकाल दोन दिवस आधीच फुटला आहे. अनेक विद्यार्थ्यांना निकालाचे ई-मेलही मिळाले आहेत. तर चूक लक्षात आल्याने सेट भवनाकडून तातडीची उपाययोजनाही सुरु करण्यात आल्याची माहिती आहे. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपण या प्रकाराची दखल घेतली असल्याचं सांगितलं . ते ''या संबंधी तातडीने चौकशी सुरु करण्यात आलीअसून उमेदवारांनी चिंता करु नये. परीक्षेचा अधिकृत निकाल २८ जूनला सहा वाजण्याच्या आधी घोषित केला जाईल. अशी ग्वाही दिली आहे. तसेच, पहिल्यांदाच उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर निकाल कळविण्यात येणार असल्याने ही प्रक्रियेतील ही तांत्रिक चूक असावी, असा अंदाजही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. भौतिकशास्त्र विषयातील बहुतेक विद्यार्थ्यांना या संदर्भातील ई-मेल काहींचे ई-मेल खुले झाले तर काहींचे नाही निकालाच्या पीडीएफमध्ये फक्त एकूण गुणांची नोंद निकाल नक्की खरा आहे की खोटा, या बद्दल संभ्रम ज्यांचा निकाल अनुत्तीर्ण आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी सेट परीक्षेचे आयोजन करण्यात येते. दोन महिन्यापूर्वी २६ मार्च २०२३ रोजी ही परीक्षा पार पडली. बुधवारी (ता.२८) या परीक्षेचा निकाल घोषित करण्यात येणार होता. मात्र, त्यापूर्वीच सोमवारी (ता.२६) दुपारी पाच नंतर अनेक विद्यार्थ्यांच्या ई-मेलवर परीक्षेचा निकालाचे मेल आल्याचे आढळून आले. या संदर्भात बुधवारी (ता.२८) निकाल घोषित होईल घडलेली घटना तांत्रिक चूक असण्याची शक्यता आहे 28 जून 2023 रोजी सविस्तर निकाल आणि कट ऑफ जाहीर होईल उमेदवारांनी अधिकृत निकालाची वाट पाहावी. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)