बल्लारपूर येथील एसएनडीटी विद्यापीठाच्या केंद्राच्या संचालक पदी प्राचार्य डॉ.आर.पी.इंगोले यांची नियुक्ती (Appointment of Principal Dr. R. P. Ingole as Director of Center of SNDT University, Ballarpur)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर येथील एसएनडीटी विद्यापीठाच्या केंद्राच्या संचालक पदी प्राचार्य डॉ.आर.पी.इंगोले यांची नियुक्ती (Appointment of Principal Dr. R. P. Ingole as Director of Center of SNDT University, Ballarpur)

चंद्रपूर :- एसएनडीटी विद्यापीठाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस डिजीटल शाळेमध्ये स्थापन झालेल्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाच्या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थांना केंद्रबिंदूस्थानी ठेऊनच काम करणारे म्हणून ख्याती असलेले प्राचार्य डॉ. आर. पी. इंगोले यांची या केंद्राचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते गोंडवाना विद्यापीठाच्या वाणिज्य विद्याशाखेचे अधिष्ठाता होते. त्यांनी वाणिज्य शाखेतून पीएचडी केली आहे. त्यांच्या नावे अनेक पुस्तके आहेत. आजपर्यंत त्यांनी अनेक संशोधनपर शोधनिबंध लिहिले असून यातील शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पीएचडी पूर्ण केली आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेतला आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते सदस्य देखील आहेत. नवनियुक्त संचालक डॉ. इंगोले यांनी या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षणासोबत विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यांच्या या नियुक्तीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी ग्वाही दिल्याप्रमाणे ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठाचा (एसएनडीटी) अभ्यासक्रम चंद्रपूरमधील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाले आहे. ७ जून २०२३ पासून या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस डिजिटल शाळेमध्ये विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाचे सुरुवात झाल्यावर विद्यार्थी विश्वात आनंदाचे वातावरण आहे. प्राचार्य डॉ. आर. पी. इंगोले यांची याच एसएनडीटी विद्यापीठाच्या बल्लारपूर केंद्राचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी गोंडवाना विद्यापीठातील प्रतिष्ठित महाविद्यालय अशी ओळख असलेल्या सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राध्यापक, वाणिज्य विभागप्रमुख व त्यानंतर प्राचार्य म्हणून देखील काम केले आहे. सेवानिवृत्तीनंतरही ते सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रीय होते. अध्यापन क्षेत्रात त्यांचा नावलौकिक होता.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)