राष्ट्रवादीच्या २५ व्या वर्धापनदिनावेळी शरद पवारांनी मोठी घोषणा : प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे कार्यकारी अध्यक्षपदी (Sharad Pawar makes big announcement on NCP's 25th anniversary : ​​Praful Patel and Supriya Sule elected as working presidents)

Vidyanshnewslive
By -
0

राष्ट्रवादीच्या २५ व्या वर्धापनदिनावेळी शरद पवारांनी मोठी घोषणा : प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे कार्यकारी अध्यक्षपदी (Sharad Pawar makes big announcement on NCP's 25th anniversary : ​​Praful Patel and Supriya Sule elected as working presidents)


मुंबई:- राष्ट्रवादीच्या आजच्या २५ व्या वर्धापन दिनावेळी शरद पवारांनी मोठी घोषणा केली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष केले आहे. ही घोषणा पवारांनी अजित पवार व्यासपीठावर असतानाच केली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचा आज २५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी यांना संबोधित करताना पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल या दोघांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष पद देण्यात आले आहे. शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष पद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांची जागा कोण घेणासर यावरून चर्चा रंगली होती. कार्यकर्ते, नेत्यांच्या आग्रहानंतर पवार यांनी हा निर्णय बदलला होता. परंतू, आज त्यांनी एकप्रकारे आपल्या उत्तराधिकाऱ्यांचीच घोषणा केली आहे. माध्यमांनी अजित पवारांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी दादा बोलणार नाहीत, असे सांगत शरद पवारांनी चांगले केले. त्यांच्यावरच्या जबाबदाऱ्या कमी होतील, असे म्हटले. तर अजित पवार माध्यमांशी न बोलताच तातडीने गाडीत बसून निघून गेले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम दिल्लीत घेण्यात आला होता. या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित होते, तर सुप्रिया सुळे अनुपस्थित होत्या. यामुळे या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे का आल्या नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे.

           24 वर्षे जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. भाजपाला अनेक राज्यांनी दूर केलेय, आता तुमची जबाबदारी. सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे, असे आवाहन शरद पवार यांनी केली. यानंतर त्यांनी भाषण थांबविले. परंतू, पुन्हा बोलत असताना त्यांनी राष्ट्रवादीतील जबाबदाऱ्यांची घोषणा करून टाकली आहे. प्रफुल पटेल यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्किंग प्रेसिडेंट असल्याची घोषणा केली. याचबरोबर त्यांच्यावर मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, गोवा अदी राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. यानंतर सुप्रिया सुळेंना देखील पवारांनी कार्यकारी अध्यक्ष केले आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी दिली आहे. सुनिल तटकरे - राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी, जितेंद्र आव्हाड बिहार, छत्तीसगड, कर्नाटक अशी जबाबदारी देण्यात आली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)