राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी मंत्रिमंडळातील 5 मंत्र्यांना वगळण्याचे भाजप श्रेष्ठीचे सूचना असल्याचे संकेत, Indications of BJP Shresthi's suggestion to drop 5 ministers from the cabinet before the expansion of the state cabinet

Vidyanshnewslive
By -
0

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी मंत्रिमंडळातील  5 मंत्र्यांना वगळण्याचे भाजप श्रेष्ठीचे सूचना असल्याचे संकेत, Indications of BJP Shresthi's suggestion to drop 5 ministers from the cabinet before the expansion of the state cabinet

मुंबई :- राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराला भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडकडून हिरवा कंदिल दाखविण्यात आला आहे. मात्र, समाधानकारक काम न केलेल्या शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळामधून वगळा, असा आदेश भाजपश्रेष्ठींनी दिला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी अडचण झाली आहे. बंडाच्या वेळी खंबीरपणे साथ देणाऱ्या सहकाऱ्यांकडून अवघ्या दहा महिन्यांत मंत्रिपद कसं काढून घ्यायचं, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना पडला आहे, त्यामुळे विस्तार लांबणीवर पडल्याची माहिती आहे. या पाच मंत्र्यांमध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे आणि अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा समावेश आहे. या सर्व मंत्र्यांनी बंडाच्या वेळी एकनाथ शिंदे यांना खंबीरपणे साथ दिली आहे. यातील चौघे तर अगोदरच्या सरकारमध्येही मंत्री होते, त्यामुळे त्यांना डावलण्याचा मोठी अवघड कामगिरी शिंदे यांच्यावर येऊन पडली आहे.

         राज्यातील मंत्र्यांच्या कामावर भाजपची एक यंत्रणा लक्ष ठेवून असल्याची माहिती असून त्या यंत्रणेमार्फत राज्यातील मंत्र्यांचे अहवाल भाजप हायकमांडकडे पाठविला जातो. त्या यंत्रणेकडून दिलेल्या अहवालामध्ये शिंदे गटातील पाच मंत्र्यांच्या कामाबाबत नकारात्मक उल्लेख आहे. त्या अहवालाचा आधार घेऊनच भाजपच्या श्रेष्ठींनी शिंदे यांना ही सूचना केली आहे. याबाबतचे वृत्त एका दैनिकाने दिले आहे. संदीपान भूमरे यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच, रोहयो आणि फलोत्पादनाच्या अनेक योजनांची प्रभावी अमलबजावणी करू शकले नाहीत, असेही म्हटलेले आहे. पाणीपुरवठ्याची कामे अपेक्षेप्रमाणे झाली नाहीत, त्यामुळे मतदारांमध्ये नाराजीची भावना आहे, असा मुद्दा गुलाबराव पाटील यांच्याबाबत उपस्थित केलेले आहे. संजय राठोड यांच्याबाबत मात्र भाजप समर्थक औषध विक्रेत्यांच्या तक्रारी वरिष्ठापर्यंत गेल्या आहेत. तसेच, पूजा चव्हाण प्रकरणातील नावामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होण्याचा धोका आहे, असे म्हटले आहे. हे सर्व एका दैनिकाने आपल्या बातमीत म्हटले आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्या विभागात कोणतेही भरीव काम केलेले नाही. तसेच, त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात आपला खासगी सचिव नेमला आहे, असा आक्षेप अहवालात घेण्यात आलेला आहे. तसेच, केंद्रीय योजनांचा लाभ कृषीमंत्री सत्तार हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू शकलेले नाहीत, त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे, असे निरीक्षण सत्तार यांच्याबाबत नोंदविण्यात आलेले आहे. भाजपच्या अहवालात ज्यांच्याबाबत आक्षेप घेण्यात आलेले आहेत, त्यांना मंत्रिमंडळ विस्तारावेळी वगळण्यात यावे, अशी सूचना दिल्लीतील हायकमांडनी केली आहे, त्यामुळे या मंत्र्यांना वगळावे, तर चुकीचा संदेश जाण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगितले जात आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)