बल्लारपुरात शासकीय कार्यालयांनी एकत्रित येत साजरा केला योग दिन, योग अंगीकृत करणे म्हणजे असाधारण शक्ती धारण करणे - श्री हरीश शर्मा (Government Offices Come Together in Ballarpur to Celebrate Yoga Day Adopting Yoga means Possessing Extraordinary Strength - Shri Harish Sharma)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपुरात शासकीय कार्यालयांनी एकत्रित येत साजरा केला योग दिन, योग अंगीकृत करणे म्हणजे असाधारण शक्ती धारण करणे - श्री हरीश शर्मा (Government Offices Come Together in Ballarpur to Celebrate Yoga Day Adopting Yoga means Possessing Extraordinary Strength - Shri Harish Sharma)

बल्लारपूर :- दिनांक 21 जून 2023 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बल्लारपूर मधील सर्व शासकीय कार्यालयांनी एकत्रित येत स्केटिंग ग्राउंड, डॉ. झाकीर हुसेन वॉर्ड, बल्लारपूर येथे  सकाळी 5.30 ते 6.30 या वेळेत योग साधना कार्यक्रम पार पाडला. सदर शासकीय कार्यक्रमात बल्लारपूरच्या तहसीलदार श्रीमती कांचन जगताप, नगरपरिषद मुख्याधिकारी श्री. विशाल वाघ, पोलिस निरीक्षक श्री. उमेश पाटील आदि प्रमुख शासकीय अधिकारी उपस्थित होते. श्री. चंदनसिंह चंदेल, माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य यांनीही कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. कार्यक्रमात नगरपरिषदचे उपमुख्याधिकारी श्री. जयवंत काटकर, शिक्षण विभाग लिपिक रीना बहोत, शहर समन्वयक श्री. मंगेश सोनटक्के, प्रभारी अग्निशमन अधिकारी श्री. शब्बीर अली यांच्यासहीत इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता. विशेष बाब म्हणजे या शासकीय कार्यक्रमात सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बल्लारपूर मधील जनता योग साधनेबाबत जागरूक असल्याची प्रचिती करून दिली. 

           २१ जुन आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त भारतीय जनता पक्ष बल्लारपूर च्या वतीने भव्य योग शिबीर व योग नृत्य कार्यक्रम एकदंत लॉन, डॉ. झाकीर हुसैन वॉर्ड, बल्लारपूर येथे आज आयोजीत करण्यात आला. कार्यक्रमाचा शुभारंभ भारत माता च्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाला. भारत माता की जय वंदे मातरम् रोज करो योग करो या उद्घोषाने संपूर्ण परिसर उत्साह व ऊर्जेने परिपूर्ण झालं. या कार्यक्रमास शहरातील नागरिकांनी प्रत्येक भागातून भव्य सहभाग नोंदवून अत्यंत उत्साहाने आनंदमय वातावरणात योग दिवस साजरा केला. प्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेता वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष मा.श्री चंदन सिंह चंदेल यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना योग हि प्राचीन भारताची पारंपरिक कला असुन आदरणीय बाबा रामदेव जी यांनी या कलेला संपूर्ण आत्मसात करून जनकल्याण करिता ईश्वरीय प्रसाद म्हणुन याचा प्रचार व प्रसार आपल्या देशात केला. या योग कलेची जाणीव ठेऊन विश्वगौरव मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी विश्व पटलावर एक दिशा देऊन संपूर्ण विश्वात वसुदेव कुटुंबकम या भावनेतुन आजचा २१ जुन ही तारीख विश्व संघा कडून आंतरराष्ट्रीय योग दिवस घोषित करून हिमालय ऊंची गाठली.योग हा आपल्या जीवनाचा नित्यक्रम असला पाहिजे व सर्वांनी याला आत्मसात करून आपलं जीवन निरोगी व सुदृढ करूया असे प्रतिपादन आदरणीय बाबूजी यांनी केले.

          बल्लारपूर नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष तथा भाजपा माजी जिल्हाध्यक्ष मा.श्री हरीश शर्मा यांनी याप्रसंगी योग हा आजच्या मानवीय जिवनात अविभाज्य घटक असलाच पाहिजे असे मत व्यक्त केले.योग   शारीरिक, मानसिक रित्या सशक्त करतो व यामुळे आपल्या शरीरात असाधारण ऊर्जेचा संचार असतो ज्यामुळे आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. प्रत्येकाने योग करून आपल्या जीवनात एक नवीन चैतन्य निर्माण करावे असे प्रतिपादन यावेळी आदरणीय हरीश भैय्या यांनी केले. या प्रसंगी मंचावर श्री काशिनाथ सिंह भाजपा शहराध्यक्ष बल्लारपूर, श्री गोपाल रेड्डी, सौ वैशाली जोशी, श्रीमती गंगाताई मल्लोजवार, सौ वंदना गोगुलवार, सौ विना झाडे, श्रीमती विजेता आर्य श्री शैलेश लोडिया व अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात भाजपा नेता, शक्तिकेंद्र, बूथ प्रमुख आणि कार्यकर्ता, भाजयुमो, पतंजली योग परिवार, लोकमत सखी मंच, रोटरी क्लब, जेसीआय, सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक तरुण उत्साही क्रीडा मंडळ व अनेक युवा कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून यशस्वी केला. कार्यक्रम आयोजन समितीचे संयोजक इंजी.देवेंद्र वाटकर, सहसंयोजक श्री बिरेंद्र श्रीवास, श्री ऋषिपाल गेहलोत, श्री प्रमोद रामिल्लावार, श्री मिथलेश खेंगर, अजहर शेख यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन श्री किशोर मोहुर्ले व आभार प्रदर्शन श्री सतीश कनकम यांनी केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)