भानापेठ येथील दुकानावर महानगरपालिकेची कारवाई, ६२० किलो प्लास्टीक जप्त (Action of the Municipal Corporation on the shop in Bhanapeth, 620 kg of plastic seized)

Vidyanshnewslive
By -
0

भानापेठ येथील दुकानावर महानगरपालिकेची कारवाई, ६२० किलो प्लास्टीक जप्त (Action of the Municipal Corporation on the shop in Bhanapeth, 620 kg of plastic seized)

चंद्रपूर -  भानापेठ येथील शक्ती पान मटेरियल या दुकानावर चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने सोमवार १९ जुन रोजी दुपारच्या सुमारास कारवाई करून ६२० किलो प्लास्टीक जप्त केले आहे शिवाय प्लास्टीकचा साठा करणाऱ्या मालमत्ताधारकास ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. भानापेठ येथील शक्ती पान मटेरियल येथे मोठ्या प्रमाणात प्लास्टीक साठा असल्याची माहीती मनपा उपद्रव शोध पथकास मिळाली होती. माहितीच्या आधारे पाहणी केली असता ६२० किलो प्लास्टीक येथे आढळून आले. बंदी असलेल्या प्लास्टीकचा साठा केल्याने सदर माल जप्त करण्यात आला असुन गोडाऊन मालकास ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.  

          

         एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे. मनपा हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास सातत्याने कारवाई केली जात असुन प्लास्टीक पिशवीला पर्याय म्हणुन मनपामार्फत विकल्प थैला नागरीकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. आतापर्यंत ७२३ दुकानदारांनी विकल्प थैलाच्या वापरास सुरवात केली असुन मनपाद्वारे ४२६६७ कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले आहे. सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक श्री.विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त श्री.चंदन पाटील, उपायुक्त श्री.अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात अतिक्रमण निर्मूलन अधिकारी श्री.संतोष गर्गेलवार, स्वच्छता निरीक्षक श्री. जगदीश शेंद्रे, श्री. मनीष शुक्ला, श्री. अनिल खोटे, श्री.भरत बिरिया, श्री.बंडू चहारे, श्री.विक्रम महातव,  श्री.डोमा विजयकर, श्री.अमरदीप साखरकर यांनी केली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)