350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र शासन विशेष टपाल तिकीट काढणार सास्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मंगळवारी राजभवनात अनावरण On the occasion of the 350th coronation ceremony of Shiv Rajya Abhishek, the Government of Maharashtra will issue a special postage stamp on the initiative of Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar, unveiled at the Raj Bhavan on Tuesday in the presence of the Governor, Chief Minister, Deputy Chief Minister.

Vidyanshnewslive
By -
0

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षांनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यात वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तुत्वाला मानवंदना देण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाने भारतीय टपाल  विभागाच्या सहकार्याने एक टपाल  तिकीट  काढण्याचा निर्णय घेतला असून येत्या मंगळवारी,6 जून रोजी महामहिम राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथील दरबार हॉल मध्ये  समारंभपूर्वक या  तिकिटाचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार, पर्यटन मंत्री श्री मंगलप्रभात लोढा, शिक्षण व मराठी भाषा मंत्री श्री दीपक केसरकर, पोस्ट मास्टर जनरल सौ स्वाती पांडे, प्रधान सचिव श्री. विकास खारगे, राज्यपालांचे सचिव श्री संतोषकुमार  प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. 'छत्रपती शिवाजी महाराज' हा आमच्यासाठी चेतनेचा संचार करणारा प्रेरणामंत्र आहे.   कित्येक राष्ट्रनायकांना लढण्याची आणि विजयाची गाढ प्रेरणा देणारे अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असून त्यांचा विचार जगभरात  जना जनानांत आणि मनामनांत पोहोचविण्याचा दृढ निश्चय महाराष्ट्र सरकारने घेतला असून याचाच एक भाग म्हणून  महाराजांवरील पोस्ट तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला असे ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. 

      शिवराज्याभिषेकाचे महत्व अधिक ठळकपणे अधोरेखित करण्याचा महाराष्ट्र शासनाचा विचार असून माँ जिजाबाई यांची यामागील भावना, संकल्पना लोकांपर्यंत पोहोचण्याचा यामागील उद्देश आहे. महाराजांच्या काळांतील नाणी, गडकिल्ले, अष्टप्रधान मंडळप्रत्येक गोष्ट ही प्रेरणादायी आहे; या प्रेरक गोष्टी सर्वांपर्यंत सहजपणे पोहोचविण्यासाठी राज्याचा सांस्कृतिक विभाग मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात पुढे सरसावला आहे. अस्मानी पातशाह्यांना टक्कर देणारा आणि स्वतःच्या जोरावर स्वराज्य स्थापन करणारा छत्रपती शिवाजी हे  महान राजे खरे  नायक आहेत; हे भावी पिढीलासुद्धा कळावे ही यामागील भावना आहे असेही सांस्कृतिक कार्य मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. शिववंदना कार्यक्रमाचे आयोजन टपाल तिकीट अनावरणा नंतर सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या वतीने शिववंदना या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)