अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांना फाशीची सजा देण्याची मागणी (Demand for death penalty to the killers of Akshay Bhalerao)

Vidyanshnewslive
By -
0

अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांना फाशीची सजा देण्याची मागणी (Demand for death penalty to the killers of Akshay Bhalerao)


बल्लारपूर :- नांदेड जिल्ह्यातील बोंढार या गावी भीम जयंती साजरी केल्याच कारणावरून जातीयवादी मानसिकतेच्या समुहानी अक्षय भालेराव या युवकाचा निर्घुण खुन केल्या प्रकरणी सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी भीम आर्मी संघटना ने मा.गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना उमेश पाटील पोलीस निरीक्षक मार्फत देण्यात आले. 5 मे रोजी शहरातील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी नगर परिषद चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अक्षय भालेराव यांना श्रद्धांजली अर्पण करुन जाहीर निषेध करण्यात आला. पुरोगामी महाराष्ट्राला कलंकीत करणारी घटना नांदेड जिल्हयातील बोंढार या गावी घडली आहे. भीम जयंती साजरी केल्याच्या कारणावरून जातीयवादी मानसीकतेच्या समुहा‌ने अक्षय भालेराव या बौद्ध युवकाचा निघून खुन केला आहे. य घटनेचा निषेध करावा, तेवढा कमीच आहे. मात्र पुरोगामी राज्यात अशी धक्कादायक घटना पुन्हा घडू नये ही जबाबदारी आहे. या घटनेतील नऊ आरोपी असुन फक्त सात जनांना अटक करण्यात आली आहे. या खुनाचा मुख्य सुत्रधार मोकाट असल्याची माहीती असून, या घटनेतील सर्वच आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. अक्षय भालेराव याच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी,या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावे इत्यादी मागण्याच्या निवेदन देण्यात आले. 

    या वेळी ॲड. मेघा भाले, बबलु करमरकर, शशिकांत निरंजने, अमर धोंगडे, अजित पडवेकर, सुमित (गोलू) डोहणे, सैफ अली खान, विलास तिरपुडे, मोहित खापर्डे, बादल ताकसांडे, रोहन कळसकर, शुभम जगताप, रोशन आमटे, अविश रामटेके, मयूर लभाने, सुदेश सिंगाडे, सुमेध ताकसांडे, रुपेश मून, सुजित रामटेके, सुमित ताकसांडे, सिद्धार्थ थोरात, तस्खर पठाण, संदेश निमसरकर, प्रशांत झांबरे, अश्विन शेंडे, ईश्वर देशभ्रतार, प्रविण उमरे, अजय चव्हाण, रोहित मेश्राम, दिपक पडवेकर, मिलाप नगराळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)