"राष्ट्रीय प्रतीक" असलेलं ध्वजस्तंभ नगर परिषदेच्या वास्तूविकासात दुर्लक्षित A flagpole with a "national symbol" neglected in the architectural development of the city council

Vidyanshnewslive
By -
0

"राष्ट्रीय प्रतीक" असलेलं ध्वजस्तंभ नगर परिषदेच्या वास्तूविकासात दुर्लक्षित A flagpole with a "national symbol" neglected in the architectural development of the city council


बल्लारपूर :- वास्तु "विकास" मध्ये अग्रसर असलेल्या बल्लापूर शहरामध्ये सद्यस्थितीत नगर पालिका प्रशासनासाठी नवीन इमारत निर्माण कार्य चालू आहे. नगर परिषदेच्या पुरातन इमारतीच्या जागेवर नवीन इमारत निर्माण कार्य चालू ठेवण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न होऊ शकत नाही यासाठी प्रशासनाने परकोट (बाउंडरी वॉल) देखील तयार केले आहे मात्र परकोट तयार करताना नगर परिषदेच्या समोर असलेला "ध्वजस्तंभ" (जो फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे ) सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही घेराबंदी नाही. गौर करणे योग्य आहे कि, सदर ध्वजस्तंभ मामूली स्तंभ नाही. नगर पालिकेच्या प्रवेश द्वाराच्या ठीक समोर स्थित या स्तंभावर राष्ट्रीय प्रतीक चिन्ह बनले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रीय पर्व असलेल्या म्हणजे स्वातंत्र्य दिन, गणतंत्र दिवस, महाराष्ट्र दिन आदि समारोहाचे मुख्य कार्यक्रम एक स्तंभावर  राष्ट्रीय ध्वज फडकावूनच सुरु होत असतात मात्र सद्यस्थितीत सदर ध्वजस्तंभ दुर्लक्षित झाला कि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे रविवार बाजार सब्जी मंडी मध्ये लागणारी दुकाने या ध्वजस्तंभ परिसरालगत असतात तसेच विविध प्रकारच्या प्रचार प्रसारित करण्यासाठी लगने वाले बैनर होर्डिंग मुळे  "अतिक्रमण" ने आपल्या चपेटमध्ये घेतला आहे. त्यामुळे नगर प्रशासनाणे याकडे वेळीच  लक्ष देवून योग्य त्या उपाय योजना कराव्या व राष्ट्रीय प्रतीक असलेल्या ध्वजस्तंभ परिसराचे पावित्र्य राखण्याच्या उपाययोजना कराव्या अशी मागणी जनमानसातून होत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)