अबब ! असाही एक चोर ज्याने चोरी केलेले तब्बल 15 तोळे सोने केले परत, शिवाय माफ करण्याची केली विनवणी (Abba ! There was also a thief who returned as much as 15 tolas of stolen gold without even begging for forgiveness)

Vidyanshnewslive
By -
0

अबब ! असाही एक चोर ज्याने चोरी केलेले तब्बल 15 तोळे सोने केले परत, शिवाय माफ करण्याची केली विनवणी (Abba ! There was also a thief who returned as much as 15 tolas of stolen gold without even begging for forgiveness)

वृत्तसेवा :- म्हणतात कि, चोरांना दया, माया नसते. लोकांनी कष्टाने मेहनतीने कमावलेला पैसा, दागिने यावर डल्ला मारताना ते एकक्षनाचाही विचार करत नाहीत. सगळे चोर असेच असतात का ? तर नाही. कारण महाराष्ट्रातील पालघरमधील एका चोराच्या कृतीने पोलिसांसह सर्वांचच मन जिंकलंय. केळवे पोलीस ठाणे अंतर्गत राहणाऱ्या प्रतीक्षा ठकसेन तांडेल यांच्या घरी 31 मे 2023 रोजी चोरी झाली होती. त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले लाखो रुपयांचे दागिने चोरट्याने लंपास केले होते. या प्रकरणात तांडेल कुटुंबियांनी केळवे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पालघर पोलिसांनी केलेल्या भावनिक आव्हानाला साथ देत या चोरट्याने मूळ मालकाला तब्बल 15 तोळे सोने मालकाला परत केले आहे. पालघरमधील केळवे पोलीस ठाणे अंतर्गत ही घटना समोर आली आहे. ठकसेन यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत स्थानिक नागरिकांना आवाहन केलं. या आव्हानाला साथ देत पाझर फुटलेल्या चोरट्याने तीन दिवसानंतर तब्बल 15 तोळ सोने रात्रीच्या सुमारास प्रतीक्षा यांच्या भावाच्या घरा समोर आणून ठेवलं. मला माफ करा, अशी चूक मी पुन्हा करणार नाही, अशी चिठ्ठी देखील चोरट्याने लिहिलं. या घटनेने फिर्यादींना आपलं सोन पुन्हा मिळालं असून त्यांनी पोलिसांचेही आभार मानले आहेत. तर दुसऱ्या बाजूला हे जनसंवाद अभियानाचं यश असल्याचं पालघर पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. शिवाय या प्रकरणात गुन्हा घडूनही गुन्ह्याच्या उकल होण्याच्या पद्धतीवरही पोलीस विभागानं समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)