माजी खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर लोकसभेच्या पोट निवडणुकीसाठी अनेक दिग्गजांची नावे चर्चेत ! (After the death of former MP Balu Dhanorkar, the names of many veterans are in discussion for the Lok Sabha by-election !)

Vidyanshnewslive
By -
0

माजी खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर लोकसभेच्या पोट निवडणुकीसाठी अनेक दिग्गजांची नावे चर्चेत ! (After the death of former MP Balu Dhanorkar, the names of many veterans are in discussion for the Lok Sabha by-election !)

चंद्रपूर :- चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं काही दिवसांपुर्वी निधन झालं. त्याच्या निधनाने चंद्रपूर लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या ठिकाणी लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपही आपला उमेदवार उभा करण्याची शक्यता असल्याने काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे. चंद्रपूर खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर कुणाला उमेदवारी द्यावी यासाठी काँग्रेसकडून हा सर्व्हे करण्यात येत आहे. तर चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे, विनायक बांगडे, आमदार प्रतिभा धानोरकर, मनोहर पाऊणकर, प्रकाश देवतळे आणि अनिल धानोरकर या सात नेत्यांची नावे चंद्रपूर लोकसभेसाठी चर्चेत आली आहेत. चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवार शोधण्यासाठी काँग्रेसने ऑनलाईन सर्व्हे घेतला होता. मात्र, सध्या काँग्रेसमधून लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सात नेते इच्छूक असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे चंद्रपूर खासदार बाळू धानोरकर हे काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार होते. त्यांच्या निधनाने राज्यातील काँग्रेस खासदारांची संख्या शून्य झाली आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही जागा काँग्रेसला ही जागा निवडून आणणे प्रतिष्ठेचे बनले आहे. त्यामुळे काँग्रेसने या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. म्हणूनच काँग्रेसने ऑनलाईन सर्व्हे करून उमेदवाराचा शोध सुरू केल्याचं सांगितलं जात आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)