धक्कादायक ! चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ, मुलं येथील कॉंग्रेस नेते संतोष रावत यांच्यावर अज्ञात इसमाचा गोळीबार, Shocking! There is excitement in the political circles of Chandrapur district, the shooting of Congress leader Santosh Rawat from Mul an by an unknown assailant.

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- मूल येथील काँग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर आज अज्ञात इसमानी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली या घटनेत संतोष रावत यांना कोणतीही गंभीर इजा झाली नसली तरी त्यांच्या हाताला घासून गोळी गेली. या संदर्भात सूत्राद्वारे मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळच्या जवळपास 5 ते 6 वाजताच्या दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मूल शाखेच्या परिसरात ही घटना घडली. गोळीबार करणारा अज्ञात असून तो फरार आहे. अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे. संतोष रावत यांच्यावर गोळीबार का करण्यात आला? कोणत्या हेतूने करण्यात आला? कोणी केला? की हा गोळीबार कुणी घडवून आणला? या प्रश्नाचे उत्तरे मात्र अनुत्तरीत आहे मूल शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)