कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल, कॉंग्रेस 135 जागांवर आघाडी घेऊन स्पष्ट बहुमताकडे (Karnataka assembly election results, Congress leads in 135 seats and clear majority)

Vidyanshnewslive
By -
0

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल, कॉंग्रेस 135 जागांवर आघाडी घेऊन स्पष्ट बहुमताकडे ? (Karnataka assembly election results, Congress leads in 135 seats and clear majority)

वृत्तसेवा :- अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभेच्या मतमोजणीला आज सकाळी सुरवात झाली असून, सुरुवातीच्या जनतेचा कल यावरून काँग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र आहे. बहुतमाचा आकडा पार करुन काँग्रेस 135 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप 70 जागांवर आघाडीवर आहे. काही ठिकाणी मात्र, भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये टक्करबाजी असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनता सत्ता कुणाकडे सोपवणार हे आज ठरणार आहे. बेळगावमधील 18 जागांपैकी 14 जागांवर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर भाजप चार जागांवर आघाडीवर आहे. बेळगावमध्ये काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. कल कमी जास्त होत आहेत. मात्र, सध्या मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस आघाडीवर असून, भाजप पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. 2018 च्या निवडणुकीत भाजपने 105 जागांवर विजय मिळवला होता तर काँग्रेस 80 जागांवरच स्थिरावली होती जेडीएस 37 तर 2 विधानसभा अन्य पक्षानी विजय मिळवला होता.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)