चिरोली जवळ दुचाकी अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू (A policeman died in a two-wheeler accident near Chiroli)
चंद्रपूर :- मूल तालुक्यातील चिरोली जवळ एका दुचाकी अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली या संदर्भातील अधिक माहितीनुसार विशाल गणपत खडके वय 42 रा. चंद्रपूर हे पोंभुर्ना येथील पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असून तेथील डाक घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे डाक घेऊन आले होते व परत पोंभुर्णा येथे जात असताना त्यांच्या दुचाकीला काल सायंकाळी 5:00 वाजताच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याची सूत्रांची माहिती असून या अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यु झाल्याची माहिती असून या घटनेत पोलीस विभागात हळहळ व्यक्त करण्यात येत असून या घटनेचा पुढील तपास मूल पोलीस करीत आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या