कारच्या भीषण अपघातात अन्न व औषध विभागाच्या निरीक्षकाचा मृत्यू (Inspector of Food and Drug Department dies in horrific car accident)

Vidyanshnewslive
By -
0

कारच्या भीषण अपघातात अन्न व औषध विभागाच्या निरीक्षकाचा मृत्यू (Inspector of Food and Drug Department dies in horrific car accident)

चंद्रपूर :- चंद्रपूर फूड ऍण्ड ड्रग्स विभागाचे निरीक्षक यांचा कारच्या अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील चिंधीमाल फाट्या जवळ घडली. चंद्रमणी डांगे (५१) असे मृतक निरीक्षकाचे नाव आहे, अपघातात डांगे यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी सुमना डांगे (४८) आणि मुलगी दिया डांगे (२१) किरकोळ जखमी झाले आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली वरून दुपारी डांगे हे आपल्या परिवारासह नागपूर ला जात असतांना चिंधीमाल फाट्या जवळ त्यांचं कार वरून नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलीस घटनास्थळी पोहचले व त्यांना तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, घटनेचा अधिक तपास नागभीड पोलीस करीत आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)