धक्कादायक ! वरोरा येथे महाविद्यालयीन तरुणाची हत्येने खळबळ, नागपूर रेल्वे स्थानकावरून एकास अटक (Shocking ! In Varora, the murder of a college youth caused excitement, one was arrested from Nagpur railway station)

Vidyanshnewslive
By -
0

धक्कादायक ! वरोरा येथे महाविद्यालयीन तरुणाची हत्येने खळबळ, नागपूर रेल्वे स्थानकावरून एकास अटक (Shocking ! In Varora, the murder of a college youth caused excitement, one was arrested from Nagpur railway station)

चंद्रपूर :- वरोरा शहरात शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाची शनिवारला सकाळी 9 च्या सुमारास विकास नगर येथे हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. रितेश रामचंद्र लोहकरे, वय 20 वर्षे, राहणार विकास नगर हा एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता.  शनिवारला सकाळी 9 वा च्या सुमारास त्याच्या एका मित्राने  रितेश ला फोन करून त्याच्या घरा नजीकच्या पानठेल्यावर बोलाविले. तिथे काही तरुण आधीच रितेश ची वाट बघत होते. रितेश आणि त्या तरुणांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर त्यांनी  रितेशवर काठीने हल्ला चढविला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

            घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविला. पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांना विचारले असता ते म्हणाले की, प्रत्यक्षदर्शींनी रितेश ला मारणाऱ्या काही व्यक्तींना बघितलेले असल्याची सूत्रांची माहिती असून सदर व्यक्तींचा शोध घेणे सुरू असून लवकरच मारेकऱ्यांना अटक करण्यात येईल. सदर हत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांनी पोलीस स्टेशनला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. विशेष म्हणजे या हत्येप्रकरणात गोलू उर्फ अनिमेश संजय रेड्डी या तरुणास नागपूर रेल्वे स्थानकावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक केली असून या प्रकरणाचा उलगडा होण्यास मदत होईल विशेष म्हणजे रितेश व गोलू हे दोघेही मित्र असून सदर घटना ही प्रेमप्रकरणातून घडल्याची चर्चा वरोरा शहरात चर्चिली जात आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)