खासदार धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक वन, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह माजी खासदार हंसराज अहीर, नरेश पुगलिया व आ. किशोर जोरगेवार यांच्यासह राजकीय वर्तुळातून व्यक्त केली शोकसंवेदना ! The news of MP Dhanorkar's death is shocking. Mr. Sudhir Mungantiwar along with former MP Hansraj Ahir, Naresh Puglia and Condolences expressed from the political circle with MLA Kishore Jorgewar!

Vidyanshnewslive
By -
0

खासदार धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक वन, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह माजी खासदार हंसराज अहीर, नरेश पुगलिया व आ. किशोर जोरगेवार यांच्यासह राजकीय वर्तुळातून व्यक्त केली शोकसंवेदना ! The news of MP Dhanorkar's death is shocking. Mr. Sudhir Mungantiwar along with former MP Hansraj Ahir, Naresh Puglia and Condolences expressed from the political circle with MLA Kishore Jorgewar!

चंद्रपूर :- चंद्रपूर, आर्णी व वणी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश ऊर्फ बाळु धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त दु:खद व धक्कादायक आहे,त्यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी शोकसंवेदना राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. खासदार धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. लोकहितासाठी आक्रमक भूमिका घेणारे अशी खासदार धानोरकर यांची ओळख होती. दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तीनच दिवसांपूर्वी म्हणजे २७ मे रोजी खासदार धानोरकर यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली. त्यानंतर आज धानोरकर यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या परिवारावर जो दु:खाचा डोंगर कोसळला आहे, त्यातून त्यांना सावरण्याची प्रार्थना माता महाकाली चरणी करतो’, अशा शब्दात ना. श्री. मुनगंटीवार यांनी धानोरकर यांच्या प्रति श्रद्धांजली व्यक्त केली.    

         दूरदृष्टी चा लढवय्या नेता बाळूभाऊ धानोरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. कुशल संघटक  विकासाची जाण असणारा दिलदार  स्वयभू नेता बाळूभाऊ धानोरकर यांच्या आकस्मिक निधनामुळे  चंद्रपूर तसेच विदर्भाचे  मोठे नुकसान झाले असून एक कर्तबगार नेता आम्ही गमवला. यामुळे काँग्रेस पक्षाचे व आमदार प्रतिभाताई धानोरकर परिवाराची मोठी हानी झाली आहे. त्यांना या संकटातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो हीच .. भावपुर्ण श्रद्धांजली अशा शब्दात माजी खासदार नरेश पुगलिया यांनी श्रद्धांजली व्यक्त केली. 

        तर खा. बाळुभाऊ धानोरकर यांच्या अकाली दु:खद निधनाने मला प्रचंड धक्का बसला आहे. ते शिवसेनेत असतांना त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले आहे. धाडसाने आणि आत्मविश्वासाने काम करणारा एक राजकीय नेता आपण गमावला आहे. माझ्या संवेदना त्यांच्या कुटूंबासोबत आहेत, धानोरकर कुटूंबियाना या दु:खातून सावरण्याची शक्ती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार स्व. बाळुभाऊ धानोरकर यांना भावपुर्ण श्रध्दांजली व्यक्त केली. 

       तसेच चंद्रपूरचे आमदार मा. किशोर जोरगेवार यांनी संवेदना व्यक्त करतांना म्हंटले कि खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनामुळं मी एका मार्गदर्शकाला मुकलो तसेच त्यांच्या निधनामुळं माझी वैयक्तिक मोठी हानी झाल्याचही त्यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त करतांना म्हंटलय.


संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)