रायगडावर होणार चंद्रपुरातील शिवकालीन नाण्याच पूजन Coins of Shiva period from Chandrapur will be worshiped at Raigad

Vidyanshnewslive
By -
0

रायगडावर होणार चंद्रपुरातील शिवकालीन नाण्याच पूजन Coins of Shiva period from Chandrapur will be worshiped at Raigad

चंद्रपूर :- रायगडावर होणार्‍या श्री. शिवछत्रपतींच्या 350 व्या सोहळ्यात चंद्रपूर येथील नाणी संग्राहक आणि अभ्यासक अशोकसिंह ठाकूर यांच्या खाजगी संग्रहातील छत्रपतींच्या 3 सुवर्ण होनांचे पूजन करण्यात येणार असून, ही चंद्रपुरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. श्री. शिवछत्रपतींचा 350 वा राज्याभिषेक सोहळा रायगड किल्ल्यावर (जेष्ठ शुद्ध त्रयोदशी) 2 जूनला पार पडत आहे. या सुवर्णक्षणाचे औचित्य साधून यावर्षी शिवछत्रपतींचे 3 सुवर्ण होन व एक अर्ध्या सुवर्ण होनाचे म्हणजेच एकूण साडेतीन सुवर्ण होनांचे पूजन तथा शिवछत्रपतींना अभिषेक होणार आहे. यात 3 अस्सल शिवराई होन, तर एक तंजावर छत्रपतींनी टंकित केलेले फनाम नाणे असणार आहे. यातील 3 सुवर्ण शिवराई होन हे चंद्रपुरातील अशोकसिंह ठाकूर यांच्या खाजगी संग्रहातील आहे. सुवर्ण शिवराई होन अत्यंत दुर्मिळ असल्याने बघायला मिळणे कठीण आहे. पण या सुवर्णदिनी अशा अस्सल 3 सुवर्ण होनांचे पूजन होणार आहे. आजपर्यंतच्या इतिहासात हा क्षण प्रथमच येत असल्याचे अशोकसिंह ठाकूर यांनी सांगितले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)