ब्रेकिंग न्युज ! चंद्रपूर-आर्णी चे खासदार बाळू धानोरकर यांचं नवी दिल्लीत उपचारा दरम्यान पहाटे निधन (Breaking news! Chandrapur-Arni MP Balu Dhanorkar passed away early in the morning during treatment in New Delhi)

Vidyanshnewslive
By -
0

ब्रेकिंग न्युज ! चंद्रपूर-आर्णी चे खासदार बाळू धानोरकर यांचं नवी दिल्लीत उपचारा दरम्यान पहाटे निधन (Breaking news!  Chandrapur-Arni MP Balu Dhanorkar passed away early in the morning during treatment in New Delhi)

चंद्रपूर- आर्णीचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. खासदार धानोरकर त्यांचे अकाली मृत्युमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. नवी दिल्ली येथे मेंदाता हॉस्पीटल येथे उपचार घेतांना त्यांनी आज पहाटे 3:30 वाजता अखेरचा श्वास घेतल्यांचे सुत्रानी सांगीतले. वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, त्यांचेवर उद्या सकाळी 11:00 वाजता वरोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. काही वर्षापूर्वी खासदार धानोरकर यांनी वेट लॉस्टची सर्जरी केली होती. या सर्जरीच्या जागेवर इंफेक्शन झाल्यांने त्यांचेवर काही दिवसापासून नागपूरात उपचार सुरू होते. किडणी स्टोनचे उपचार झाल्यानंतर, त्यांचे पोटात दुखणे वाढल्यांने एअर अम्बुलन्सने त्यांना मेंदाता हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यांचेवर उपचार चालू असतांनाच आज पहाटे त्यांची प्रकृती खालावल्याने वेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. या दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची आज बातमी आहे. वरोरा भद्रावती मतदार संघातून शिवसेनेचे आमदार असलेल्या बाळू धानोरकर यांनी 2019 च्या निवडणूकीत कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळवीत विजय मिळविला होता. राज्यात ते कॉंग्रेसचे एकमेव खासदार होते. खासदार म्हणून निवडूण आल्यानंतर, त्यांनी आपल्या पत्नीलाही आमदार म्हणून निवडूण आणण्यात मोठी भुमिका बजावली होती. 

          ४ जुलै १९७५ रोजी वणी जिल्हा यवतमाळ येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील स्व. नारायण धानोरकर शिक्षक होते. चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार होते. 48 वर्षाच्या अल्पवयात त्यांनी कट्टर शिवसैनिक ते खासदार असा थक्का करणारा प्रवास केलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख असा प्रवास करीत युतीच्या सुवर्णकाळात त्यांनी भाजपच्या दृष्टीने कधीच सर न झालेला वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ बांधून काढला. त्यांना 2009 साली शिवसेनेने याच क्षेत्रातून तिकीट दिली. मात्र यशाने थोडक्यात हुलकावणी दिली. 2014 पर्यंत वेगवेगळी आंदोलने आणि संघटनात्मक बांधणी करत बाळू धानोरकर यांनी शिवसेनेसाठी मतदारसंघ अनुकूल केला परिणामी शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी जिंकली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना अचानकपणे कॉंग्रेसची चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात उमेदवारी मिळाली. कार्यकर्त्यांची साथ व भक्कम जनसंपर्क या बळावर त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला. राज्यात काँग्रेस लोकसभेत शून्य झाली असताना आश्चर्यकाररित्या बाळू धानोरकर राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार ठरले. लगेच झालेल्या निवडणुकीत त्यांनी आपल्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसची तिकीट खेचून आणत आणि जिंकत वरोरा-भद्रावती हा त्यांचा मतदारसंघ स्वतःकडे कायम ठेवला.

           लोकसभेत आपल्या विविध भाषणाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धोरणावर टीका , मतदारसंघाचे प्रश्न, विदर्भाचे मुद्दे त्यांनी लावून धरलेत. अशातच शुक्रवार, दिनांक 26 मे रोजी त्यांना नागपुरात किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. आज 30 मे च्या पहाटे 3:30 वाजता त्यांचं उपचारा दरम्यान दुःखद निधन झाल्याचं वृत्त असून उद्या 31 मार्च ला सकाळी 11:00 वाजताच्या दरम्यान त्यांच्या गावी वरोरा येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येईल.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)