कारवा रोडवर कॅटर्स द्वारे अन्न टाकणाऱ्यावर व कोंबड्यांचे अवशेष फेकणाऱ्यांवर कारवाईची मागणी (Demand action against those who throw food and chicken remains by caterers on Karwa Road)

Vidyanshnewslive
By -
0

कारवा रोडवर कॅटर्स द्वारे अन्न टाकणाऱ्यावर व कोंबड्यांचे अवशेष फेकणाऱ्यांवर कारवाईची मागणी (Demand action against those who throw food and chicken remains by caterers on Karwa Road)

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक मौलाना आझाद वॉर्डाला लागून असलेल्या कारवा रोडवर लग्नसोहळे व इतर कार्यक्रमानंतर उरलेले खाद्यपदार्थ कारवा रोडवर बांधलेल्या स्वच्छतागृहा समोर फेकले जात असून त्यामुळे नागरिकांच्या पाळीव प्राण्यांचा मृत्यू होत आहे. असाच एक प्रकार समोर आला आहे, रवींद्र नगर वॉर्डातील रहिवासी दूधनाथ यादव यांच्या गायीने कॅटर्स वाल्यानी फेकलेला भात खाऊन गाईच्या मृत्यू झाला त्यामुळं गाईच्या मालकाचे नुकसान झाले असून, लोकांच्या आरोग्यासाठीही ते जीवघेणे ठरत आहे. वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे., नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी आपले काम चोख बजावतात मात्र कोंबडी व्यावसायिक व कॅटर्स व्यावसायिक हा परिसर प्रदूषित करत आहेत. या आवारात पाळीव प्राणी मृत्युमुखी पडत असल्याने वन्य प्राण्यांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे संबंधित विभागाकडे लक्ष देण्याची विनंती दुधनाथ यादव यांनी केली आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)