सरकारने सुरु केलं संचार साथी पोर्टल, एकावेळीच होणार तीन कामं (Govt launched Sanchar Saathi portal, three works will be done simultaneously)

Vidyanshnewslive
By -
0

सरकारने सुरु केलं संचार साथी पोर्टल, एकावेळीच होणार तीन कामं (Govt launched Sanchar Saathi portal, three works will be done simultaneously)

वृत्तसेवा :- केंद्र सरकारने संचार साथी पोर्टल (Sanchar Saathi Portal) लाँच केले आहे. दूरसंचार क्षेत्रातील पारदर्शकता, सुरक्षा आणि जबाबदारी वाढवणे हा संचार साथी पोर्टलचा प्रमुख उद्देश आहे. तुमच्या नावावर कोणी मोबाईल कनेक्शन घेतले आहे का? तुमच्या फोटोचा वापर करुन कोणी कनेक्शन घेतले आहे का? किंवा तुमचा मोबाईल हरवला आणि तो तुम्हाला ब्लॉक करता येत नाही, तर ही कामं आता क्षणार्धात होणार आहेत. यासाठी सरकारने संचार साथी पोर्टल सुरु केले आहे. केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच संचार साथी पोर्टलची सुरुवात केली आहे. मोबाईल कनेक्शन आणि टेलिकम्युनिकेशन संबंधित विविध सुधारणा करणे हा या पोर्टलचा मुख्य उद्देश असणार आहे. या सेवेचा वापर https://sancharsaathi.gov.in तुम्ही दिलेल्या लिंकच्या मदतीने करता येणार आहे. हे पोर्टल करेल एकावेळी तीन काम, पोर्टलच्या लाँच वेळी मंत्र्यांनी सांगितले की या पोर्टलच्या माध्यमातून एकाचवेळी तीन गोष्टी केल्या जातील. हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल फोन वेळीच ब्लॉक करणे हे याचे पहिले काम असेल. तसेच सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टरची (CEIR) देखील यात सुरुवात करण्यात आलेली आहे. ज्याच्या मदतीने हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल फोन तात्काळ ट्रॅक किंवा ब्लॉक करता येणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)