मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित मार्गावर ट्रॅक्टर पलटून दोन गंभीर जखमी, तर दोघांचा मृत्यू ! (Tractor overturned on Pipri Dixit road in Mula taluka, two seriously injured, two dead !)

Vidyanshnewslive
By -
0

मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित मार्गावर ट्रॅक्टर पलटून  दोन गंभीर जखमी, तर दोघांचा मृत्यू ! (Tractor overturned on Pipri Dixit road in Mula taluka, two seriously injured, two dead !)

चंद्रपूर :- विद्युत खांब घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित -भंजारी मार्गावर घडली. या घटनेत दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. मिथुन पांडुरंग मडावी, अंकुश राजू गंदेरशीरवार अशी मृतांची नावे आहेत. तर सुभाष रणदिवे, ईश्वर मांडवकर हे दोघे जखमी झाले असून हे सगळे मूल तालुक्यातील केळझर येथील रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस घटनास्थळी पोहोचत ट्रॅक्टर खाली दबलेल्या दोघांनाही बाहेर काढण्यात आलं. गंभीर जखमी असलेल्यांना दोघांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहेत. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळेस हे चौघेही ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर बसले होते. विनोद मराठे आणि गुरुदेव रामदास सातरे हे दोघे ट्रॅक्टर चालक आशिष निकोडे याच्या बाजूला बसले होते. त्यामुळे हे तिघे बचावले. विशेष म्हणजे जड वाहतूक करणाऱ्या या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला नंबर प्लेटच नव्हती. पोलीस विभागाच्या दुर्लक्षाचा फायदा घेऊन शेती कामासाठी घेतलेल्या बहुतांश ट्रॅक्टरमधून जड वाहतूक करतात. यामुळे अशा घटना घडत असल्याचे बोलले जात आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)