चंद्रपुरातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक, मात्र उपचाराला प्रतिसाद देत असल्याची कुटुंबीयांची माहिती Balu Dhanorkar, the only Congress MP from Chandrapur, is in critical condition, but is responding to treatment, according to family members.

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपुरातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक, मात्र उपचाराला प्रतिसाद देत असल्याची कुटुंबीयांची माहिती (Balu Dhanorkar, the only Congress MP from Chandrapur, is in critical condition, but is responding to treatment, according to family members.)

चंद्रपूर :- चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर दिल्लीच्या वेदांता रुग्णालयात उपचार घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी ते नागपुरात खासगी इस्पितळात दाखल झाले होते. शस्त्रक्रियेनंतर गुंतागुंत झाल्यावर त्यांना एअर ॲम्बुलन्सद्वारे दिल्लीत हलविण्यात आले. त्यांच्या आतड्यांवर सूज असल्याची प्राथमिक माहिती असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. खासदार धानोरकर उपचारांना प्रतिसाद देत आहेत. त्यांची पत्नी आणि वरोरा विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह दोन्ही मुले देखील दिल्लीत आहेत. खासदार धानोरकर यांचे निकटवर्तीय दिल्लीत दाखल झाले आहेत. अफवांवर विश्वास नको धानोरकर वेदांता रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असले तरी ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत. त्यांची प्रकृती सुधारत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयातून करण्यात आलं आहे. धानोरकर यांचे वडील नारायण धानोरकर यांचे काल 27 मे रोजी निधन झालं. त्याच्या मूळगावी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यातच बाळू धानोरकर यांचीही तब्येत बिघडल्याने कालच त्यांना दिल्लीतील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. बाळू धानोरकर हे आधी शिवसेनेत होते. चंद्रपूरमधील वरोरा विधानसभा मतदारसंघातून ते शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला अन् लोकसभेवर निवडून गेले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)